शेपटीसह जन्माला आलं बाळ; प्रसुती करणारे डॉक्टरही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 14:43 IST2022-01-14T14:43:28+5:302022-01-14T14:43:48+5:30
नवजात अर्भकावर तीन शस्त्रक्रिया; बाळाची प्रकृती स्थिर

शेपटीसह जन्माला आलं बाळ; प्रसुती करणारे डॉक्टरही चक्रावले
भुवनेश्वर: ओदिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. एक नवजात मूल शेपटीसह जन्माला आलं. शेपटीसह जन्माला आलेलं मूल पाहून डॉक्टरदेखील चक्रावले. शस्त्रक्रिया करून शेपूट काढण्यात डॉक्टर यशस्वी झाले. आतापर्यंत जगभरात अशा प्रकारच्या १९५ घटना घडल्या आहेत. या घटना दुर्मीळ समजल्या जातात.
एका खासगी रुग्णालयात बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉ. अशोक कुमार महापात्रा यांनी दिली. नवजात बाळाच्या पाठीच्या हाडात विसंगती होती. त्याच्या पाठीच्या वरच्या भागात शेपटी होती. पुरी जिल्ह्यातल्या आरोग्य केंद्रात या बाळाचा जन्म झाला होता.
शेपटीसह बाळाला जन्म येणं दुर्मीळ घटना समजली जाते. जगात आतापर्यंत अशा प्रकारच्या १९५ घटना घडल्या आहेत. या मुलावर तीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. हा प्रकार दुर्मीळ असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. गर्भात असताना बऱ्याच बाळांना शेपूट येतं. मात्र आठ आठवड्यांनंतर ती गायब होते. मात्र काहीवेळा शेपूट गायब होत नाही आणि मूल शेपटासह जन्माला येतं, असं महापात्रा यांनी सांगितलं.