जगातल्या प्रत्येक जीवाची काहीना काही खासियत असते. असे अनेक जीव आहेत जे अनेक दिवस काहीच न खाता-पिता जिवंत राहू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका दुर्मीळ जीवाबाबत सांगणार आहोत. हा जीव काहीच न खाता-पिता अनेक वर्ष जिवंत राहू शकतो. सॅलामॅंडर नावाचा हा जीव दक्षिण पूर्व यूरोपमधील बोस्निया देशात आणि हर्जेगोविनामध्ये पाण्याखाली असलेल्या गुहांमध्ये आढळून आला.
साधारण ७ वर्ष होऊन गेल्यावरही सॅलामॅडर आपल्या जागेवरून हलत नाही. वैज्ञानिकांनुसार, या जीवाची त्वचा आणि अविकसित डोळे त्यांना अंध करते. कदाचित हेच कारण आहे की, हा जीव आपल्या जागेवरून हलत नाही. पण एखादा जीव आपल्या जागेवरून न हलणं ही असामान्य बाब नाही.
सॅलामॅडरचं संपूर्ण आयुष्य पाण्याखाली जातं आणि त्याचं वय १०० वर्ष इतकं असतं. हा जीव साधारण स्लोवेनियापासून ते क्रोएशियासारख्या बाल्कन देशात आढळून येतो. सॅलामॅडर आपली जागा १२ वर्षांनी तेव्हाच बदलतो जेव्हा त्याला जोडीदाराचा शोध घ्यायचा असतो.
हंगेरियन नॅच्युरल हिस्ट्री म्युझिअमचे ज्यूडिट वोरोस यांच्यानुसार, 'याआधी अशा जीवांची कल्पना केली गेली होती. इथे भरपूर पाऊस झाल्यावर हे जीव गुहेतून वाहून बाहेर आल्यानंतर आम्ही त्यांना बघू शकतो. नाही तर त्यांना बघण्यासाठी आम्हाला पाण्यातील गुहेंमध्ये जावं लागलं असतं. पण आता गुहेच्या पाण्यातील अंश बघूनच आम्ही हे सांगू शकतो की, ते तिथे आहेत किंवा नाही'.
सॅलामॅडर ज्या गुहेंमध्ये राहतात तिथे जेवण मिळणं सोपं नाही. त्यामुळे हा जीव काहीच न खाता अनेक वर्ष जिवंत राहू शकतो. पण जेव्हाही सॅलामॅडर सक्षम होतात तेव्हा ते छोटे कीटक खाऊ शकतात.