६८ वर्ष आहे या पक्ष्याचं वय, ३७ वेळा दिली त्याने अंडी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 12:25 PM2018-12-15T12:25:25+5:302018-12-15T12:27:43+5:30

Albatross ही एक प्रजाती आहे. हे पक्षी समुद्रावर जास्तकरुन उडताना बघायला मिळतात. हे पक्षी एकतर संभोगासाठी थांबतात नाही तर मग घरटं तयार करण्यासाठी थांबतात.

World oldest breeding bird 68 years becomes mother in 37th time | ६८ वर्ष आहे या पक्ष्याचं वय, ३७ वेळा दिली त्याने अंडी!

६८ वर्ष आहे या पक्ष्याचं वय, ३७ वेळा दिली त्याने अंडी!

googlenewsNext

Albatross ही एक प्रजाती आहे. हे पक्षी समुद्रावर जास्तकरुन उडताना बघायला मिळतात. हे पक्षी एकतर संभोगासाठी थांबतात नाही तर मग घरटं तयार करण्यासाठी थांबतात. नाही तर ते तसे सतत उडतच असतात. याच प्रजातीचा एक मादा पक्ष्याने चंद्राच्या १२ फेऱ्या मारुन होतील इतका प्रवास केला आहे.

या पक्ष्याचं नाव विस्डम असं ठेवण्यात आलं असून हा पक्षी जगातला सर्वात वयस्क पक्ष्यांपैकी एक आहे. या पक्षाने आत्तापर्यंत साधारण ३ लाख मैलाचा प्रवास केला आहे. म्हणजेच ४ लाख ८२ हजार किलोमीटर. याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे या पक्षाने ३७ वेळा अंडीही घातली आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे पक्षांची ही प्रजाती कमी होत चालली आहे. विस्डमने आत्तापर्यंत ३७ वेळा अंडी घातली आहेत. विस्डमच्या पायावर एक टॅग लावण्यात आला असून त्यानुसार त्याच्या हालचालीची माहिती मिळवता येते.

विस्डमवर बायोलॉजिस्ट केली गुडेल या २००६ पासून नजर ठेवून आहेत. त्यांचं मत आहे की, या पक्ष्याचं वय जवळपास ६८ वर्ष आहे. यूएस फिस अॅन्ड वाइल्डलाइफ सर्व्हिस विभागाचं म्हणणं आहे की, विस्डम हा त्यांना माहीत असलेला सर्वात जुना पक्षी आहे. हवाईजवळ एका आयलॅंडवर विस्डम सध्या आपलं घर तयार केलं आहे. 
 

Web Title: World oldest breeding bird 68 years becomes mother in 37th time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.