भारतात भगवान शिवाच्या वेगवेगळ्या भागात मूर्ती बघायला मिळतात. पण आता भगवान शिवाची जगातली सर्वात मोठी मूर्ती बघायला मिळणार आहे. या मूर्तीचं काम शेवटच्या टप्प्यात आलं आहे. या मूर्तीचं काम राजस्थानच्या नाथद्वारामधील गणेश टेकडीवर केलं जात आहे. रिपोर्ट्सनुसार, या मूर्तीचं काम ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण होऊ शकतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मूर्तीचा चेहरा रंगवला गेला आहे. आणि सध्या हात, पाय आणि छातीवर वेगाने काम सुरू आहे. ही मूर्ती ३५१ फूटाची आहे. तर या मूर्तीला बघण्यासाठी २० फूटावर, ११० फूटावर आणि २७० फूटावर अशा तीन गॅलरी करण्यात आल्या आहेत. या गॅलरी लिफ्टशी जोडल्या गेल्या आहे.
मूर्तीची खासियत
१) या मूर्तीचा आधार हा ११० फूड खोल आहे. तर पंजे ६५ फूट सांगितले जात आहेत.
२) पंजांपासून ते टोंगळ्यांपर्यंतची उंची १५० फूट आहे. तर खांदे २६० व कमरबंद १७५ फूट उंचीवर आहे.
३) त्रिशूलची लांबी ३१५ फूट आहे आणि केसांचा अंबाडा १६ उंच आहे. २७५ फूटावर भगवान शिवाचा चेहरा आहे. चेहरा ६० फूट लांब आहे.
४) ही मूर्ती तयार करण्यासाठी २ हजार २०० टनांपेक्षा अधिक स्टील. तर या परिसरात ३०० फूटात गार्डन तयार करण्यात येणार आहे.
५) या मूर्तीचं काम २०१२ मध्ये सुरू करण्यात आलं होतं.
दरम्यान याआधी नेपाळमध्ये कैलाशनाथ मंदिरात शिवाची मूर्ती १४३ फूटाची आहे. तर कर्नाटकातील मुरूदेश्वर मंदिरात शिवाची मूर्ती १२३ फूटाची आहे. तसेच तामिळनाडूच्या आदियोग मंदिरात ११२ फूटाची मूर्ती आहे.