शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

लसूण खाल्ला तर जाऊ शकतो 'या' महिलेचा जीव, कारण वाचून व्हाल अवाक्! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 16:00 IST

Vampire Disease : अमेरिकेतील एका महिलेला एक अजब आजार झाला आहे. ज्याबाबत तुम्हालाही काहीच कल्पना नसेल.

Vampire Disease : जगभरात असे अनेक आजार आहेत, ज्यांबाबत लोकांना काहीच माहीत नसतं. काही आजार तर इतके अजब असतात की, ज्यांबाबत वाचल्यावर हैराण व्हायला होतं. अमेरिकेतील एका महिलेला असाच अजब आजार झाला आहे. ज्याबाबत तुम्हालाही काहीच कल्पना नसेल. या आजारामुळे महिलेने जर लसूण खाल्ला तर तिचा जीवही जाऊ शकतो.  

अमेरिकेच्या मिनोसोटाची ३२ वर्षीय महिला फीनिक्स नायटिंगेलसोबत लसणाबाबत अशीच एक अजब कंडीशन आहे. या महिलेला ‘acute intermittent porphyria’ नावाचा दुर्मिळ आजार आहे. हा आजार एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. ज्यात अंगदुखी, डोकेदुखी, बद्धकोष्ठता, उलटी यांसारखी लक्षणं दिसतात. या महिलेला या समस्या लसणामुळे होतात. या महिलेला सल्फरची एलर्जी आहे आणि लसणामध्ये भरपूर सल्फर असतं. जर तिने लसूण खाल्ला तर तिचा जीवही जाऊ शकतो.

काही रिपोर्टनुसार, या आजाराला वॅम्पायर डिजीज असंही म्हणतात. हा विचित्र आजार असलेली फीनिक्स दोन मुलांची आई आहे. फीनिक्स असं काहीच खाऊ शकत नाही, ज्यात सल्फर असतं. महिलेने सांगितलं की, लसणाची एक कळी खाऊन तिचा जाणार नाही. केवळ एलर्जी वाढेल. पण तिने जर नियमितपणे सल्फर असलेले पदार्थ खाल्ले तर तिचा जीव जाऊ शकतो. 

फीनिक्सने सांगितलं की, आतापर्यंत तिला ४८० अटॅक येऊन गेलेत, ज्यात तिला उलटी झाली होती. गेल्यावर्षीच तिला या अजब आजाराबाबत तिला समजलं. तेव्हाच तिला हेही समजलं की, ती काय काय खाऊ शकत नाही. इतकंच नाही तर ती बाहेरचेही कोणते पदार्थ खाऊ शकत नाही. कारण बाहेरच्या जास्तीत जास्त पदार्थांमध्ये लसणाचा अधिक वापर केला जात असतो. आता ती तिच्या आजाराबाबत लोकांना माहिती देत आहे. जेणेकरून या आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरावी.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेHealthआरोग्य