बाबो! नवऱ्याला कुत्र्याचा पट्टा घालून बायको फिरवत होती; पोलिसांनी वसूल केले २ लाख

By manali.bagul | Published: January 13, 2021 01:08 PM2021-01-13T13:08:20+5:302021-01-13T13:23:04+5:30

Trending Viral News in Marathi : या महिलेनं पतीच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधून ठेवला होता आणि रस्त्यावर एखाद्या कुत्र्याप्रमाणे आपल्या पतीला फिरवत होती.

Woman takes husband to walk on leash during night curfew in canada | बाबो! नवऱ्याला कुत्र्याचा पट्टा घालून बायको फिरवत होती; पोलिसांनी वसूल केले २ लाख

बाबो! नवऱ्याला कुत्र्याचा पट्टा घालून बायको फिरवत होती; पोलिसांनी वसूल केले २ लाख

Next

(representative image source: Curiocity)

जगभरातील अनेकांना कोरोना संकटाचा सामना करावा लागत आहे. २०२० पासून सगळ्यांनी मास्कला लावायला सुरूवात केली. दरम्यान कोरोनाच्या प्रसारामुळे कनाडातसुद्धा चार आठवड्यांचा कर्फ्यू लावला असून  सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत लोकांना बाहेर फिरता येणार नाही. फक्त महत्वाच्या कामासांठीच लोक घराबाहेर पडू शकतात.  एक धक्कादायक घटना कॅनडामधून समोर आली आहे. 

किंग स्ट्रिट ईस्टमध्ये एका महिलेनं कमाल केली आहे. या महिलेनं पतीच्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा बांधून ठेवला होता आणि रस्त्यावर एखाद्या कुत्र्याप्रमाणे आपल्या पतीला फिरवत होती. लॉकडाऊन असताना या महिलेला रस्त्यावर पाहून 'तू इथं काय करत आहेत.' अशी विचारणा पोलीसांनी केली. त्यावर ती महिला म्हणाली, ''मी माझ्या पाळीव प्राण्याला फिरवत आहे आणि पाळीव प्राण्यांना फिरवण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे.''  बोंबला! आईनं चुकून भलतीच क्रिम लावली अन् चिमुरड्या लेकाचा चेहरा बघा कसा झाला....

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हे जोडपं पोलिसांशी बोलण्यास तयार नव्हते. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन न केल्यामुळे पोलिसांनी या दोघांनाही १५००-१५०० डॉलर दंड लावला आहे. भारतीय चलनानुसार  २ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. असं पहिल्यांदा झालंय असं अजिबात नाही. मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यातसुद्धा एक माणूस लॉकडाऊन असताना कुत्र्याला बाहेर फिरवण्यासाठी  घेऊन गेला होता.  पोलिसांनी जेव्हा या माणसाला पकडलं तेव्हा कळलं  हा कुत्रा नसून हे एक खेळणं घेऊन हा माणूस फिरायचा. हा प्रकार समोर आल्यानंतर सदर माणसावर पोलिसांना कारवाई केली होती. माणुसकीला काळीमा! मुक्या जीवाला कारच्या मागे बांधून संपूर्ण शहरभर फरपटत नेलं

Web Title: Woman takes husband to walk on leash during night curfew in canada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.