पार्टीला न बोलवल्याने महिलेने सहकाऱ्यांकडून घेतली ७२ लाखांची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 11:34 AM2022-05-23T11:34:15+5:302022-05-23T11:37:56+5:30

तिच्या सहकाऱ्यांनी तिच्यासमोर पार्टीचा प्लॅन केला आणि तिला आमंत्रित देखील केलं नाही तेव्हा तिला या गोष्टीसाठी खूप वाईट वाटलं. महिलेने हे प्रकरण न्यायालयात खेचलं आणि तिला ७२ लाखांची भरपाईही मिळाली.

woman sues office colleagues for not inviting for party | पार्टीला न बोलवल्याने महिलेने सहकाऱ्यांकडून घेतली ७२ लाखांची भरपाई

पार्टीला न बोलवल्याने महिलेने सहकाऱ्यांकडून घेतली ७२ लाखांची भरपाई

Next

आयुष्यात काही गोष्टी अतिशय छोट्या वाटतात, मात्र त्याने आपलं मन खूप दुखावतं. असंच काहीसं एका महिलेसोबत घडलं, जेव्हा तिच्या कामाच्या ठिकाणी सर्व लोकांनी मिळून पार्टीचा प्लॅन बनवला आणि यात तिला सहभागी करून घेतलं नाही. विशेष म्हणजे या महिलेनं रडत बसण्याऐवजी थेट कोर्टात केस दाखल केली.

रिटा लेहर नावाच्या ५१ वर्षीय महिलेसोबत ही घटना घडली आहे. ती कॅसिनोमध्ये कॅशियर म्हणून काम करायची. या ब्रिटीश महिलेचं आयुष्य अगदी मजेत जात होतं, परंतु जेव्हा तिच्या सहकाऱ्यांनी तिच्यासमोर पार्टीचा प्लॅन केला आणि तिला आमंत्रित देखील केलं नाही तेव्हा तिला या गोष्टीसाठी खूप वाईट वाटलं. महिलेने हे प्रकरण न्यायालयात खेचलं आणि तिला ७२ लाखांची भरपाईही मिळाली (Woman Wins 72 Lakhs because Colleagues not Invited her for Party).

लंडनच्या एस्पर्स कॅसिनोमध्ये काम करणारी रीटा लेहर ही खरं तर एक कृष्णवर्णीय आफ्रिकन आहे आणि जेव्हा सहकर्मचार्‍यांनी तिला परकेपणाची जाणीव करून दिली, तेव्हा तिनं दावा केला की हे केवळ तिचं वय आणि वंशामुळं झालं आहे. ती २०११ पासून एस्पर्स कॅसिनोमध्ये काम करत होती. तिच्यासोबतच्या अशा अनेक सहकाऱ्यांचं प्रमोशन झालं, जे रीटासारखे किंवा आफ्रिकन वंशाचे नव्हते. कृष्णवर्णीय असल्यामुळे तिच्यासोबत भेदभाव करण्यात आला. तिच्याकडे एकतर दुर्लक्ष केलं गेलं किंवा तिला नकाराचा सामना करावा लागला. तिचा २२ वर्षांचा कामाचा अनुभवही हा भेदभाव दूर करू शकला नाही.

या प्रकरणात कार्मिक न्यायाधीश सारा मूर यांनी निकाल देताना लेहरच्या समस्येवर प्रकाश टाकला. टेलीग्राफच्या अहवालानुसार, ते म्हणाले की कामाच्या ठिकाणी कोणत्याही कर्मचाऱ्याला अशा प्रकारची वागणूक दिल्याने त्याला लोकांमध्ये मिसळण्याची संधी मिळत नाही. विशेषत: हे जर एखाद्या सामाजिक प्रसंगी केलं गेलं तर ते नक्कीच दुःख पोहोचवणारं असतं. न्यायालयाने एस्पर्स कॅसिनोला लेहरला भावनिक त्रास दिल्याबद्दल आणि ओव्हरटाइमच्या नुकसानीबद्दल £74,113.65 (भारतीय चलनात 72 लाख रुपये) भरपाई देण्याचे आदेश दिले.

Web Title: woman sues office colleagues for not inviting for party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.