शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बोंबला! या महिलेने ३०० वर्ष जुन्या भूताशी केलं होतं म्हणे लग्न, नंतर झाले वेगळे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 15:46 IST

वेगवेगळ्या सिनेमांमध्ये तुम्ही महिला भूतांसोबत लग्न करताना पाहिलं असेल. खरंतर या काल्पनिक गोष्टी सिनेमात बघणं फारच रोमांचक वाटतं.

वेगवेगळ्या सिनेमांमध्ये तुम्ही महिला भूतांसोबत लग्न करताना पाहिलं असेल. खरंतर या काल्पनिक गोष्टी सिनेमात बघणं फारच रोमांचक वाटतं. आपण ते बघत असताना त्यात हरवूनही जातो. नंतर बाहेर आलो की, ते विसरून जातो. पण आम्ही जर तुम्हाला सांगितलं की, एका महिलेने भूतासोबत लग्न केलं तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना? आमचाही यावर विश्वास नाही. 

भलेही भूत-प्रेत-आत्मा या गोष्टी अंधश्रद्धा किंवा खोट्या गोष्टी असतील पण आजही काही लोकांच्या मनात या गोष्टींनी घर केलं आहे. त्यांना कदाचित आता या महिलेचंच घ्या ना, तिने तब्बल ३०० वर्ष जुन्या भूतासोबत लग्न केल्याचा दावा केला आहे. आता यावर हसावं की, रडावं हेच कळत नाहीये. पण तरी जाणून घेऊ नेमकं प्रकरण तरी काय आहे.

Amanda Teague असं या महिलेचं नाव असून ती ४५ वर्षांची आहे. ५ मुलांची आई असलेली ही महिला गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती कारण तिने एका ३०० वर्ष जुन्या भूताशी लग्न केलं. Amanda ने एका Haitian समुद्री डाकूसोबत लग्न केलं. तिने याबाबत सांगितले की, त्याच नाव आहे जॅक. तो १८व्या शतकात समुद्रात दरोडेखोर होता. इतकेच नाही तर Amanda सांगते की, ती त्याच्यासोबत २०१४ पासून बोलते. 

People.com ला दिलेल्या मुलाखतीत या महिलेने सांगितले की, जेव्ह ती जॅकसोबत वेळ घालवू लागली, त्यांची भावना तीव्र होऊ लागल्या होत्या. ती सांगते की, 'आधी तर मी याकडे दुर्लक्ष केलं'. तिने सांगितले की, याआधीही तिने भूतांशी संवाद साधला. पण जॅकसोबतचं फिलिंग वेगळं होतं. इतकं की, दोघांमध्ये शारीरिक संबंधही झालेत. ती सांगते की, याला Spectrophilia म्हटलं जातं. हे आयर्लंडमध्ये शिकवलं जातं की, कशाप्रकारे ज्या व्यक्तीसोबत तुमचे शारीरिक संबंध सुरू आहेत, त्याच्याशी तुम्ही लग्न करू शकता. त्यानुसार दोघांनी लग्न केलं. 

Amanda ने सांगितले की, त्यांनी एका बोटवर लग्न केलं आणि या लग्नाला केवळ जवळचे नातेवाईक आले होते. भूताकडून रिंग घालण्यासाठी त्यांनी एका मध्यस्थी व्यक्तीलाही बोलवलं होतं.  ती सांगते की, तिचा पती जॅक स्पॅरोसारखा वाटतो. लग्न तर झालं. पण नंतर एक वाईट बातमी आली. 

डिसेंबर २०१८ मध्ये Amanda ने घोषणा केली की, तिचं लग्न संपुष्टात आलं. म्हणजेच जॅक नावाचं भूत आणि ती वेगळे झाले आहेत. हे नातं आता संपलं आहे. 'द सन' दिलेल्या मुलाखतीत Amanda ने सांगितले की, जॅकने तिला दोनदा जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच लग्नानंतर तिची तब्येतही बरोबर राहत नव्हती. ज्यामुळे दोघे वेगळे झालेत. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्न