शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

महिलेनं रुग्णालयातून केली नवजात बाळाची चोरी, मात्र १७ वर्षांनी सत्य आलं बाहेर....पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 16:17 IST

या घटनेत ज्या बाळाची चोरी झालेली (Woman Kidnap Baby Girl from Hospital) ती मुलगी आता मोठी झाली असून तिने आपल्याला चोरी करणाऱ्या महिलेचीच बाजू घेतली आहे.

एखादी व्यक्ती हॉस्पिटलमधून नवजात बाळाला चोरते आणि नंतर त्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवते, असं तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये (Film Story) पाहिलं असेल. यानंतर अनेक वर्षांनंतर मुलाला सत्य कळतं आणि मग नायक क्लायमॅक्समध्ये आपल्या खऱ्या पालकांना भेटतो. नुकतंच अमेरिकेतही असंच प्रकरण समोर आलं आहे. मात्र या घटनेत ज्या बाळाची चोरी झालेली (Woman Kidnap Baby Girl from Hospital) ती मुलगी आता मोठी झाली असून तिने आपल्याला चोरी करणाऱ्या महिलेचीच बाजू घेतली आहे.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अलेक्सिस मनिगोचा जन्म १९९८ मध्ये फ्लोरिडा येथील जॅक्सनविले येथील रुग्णालयात झाला होता. तेव्हा तिचं नाव कामिया मोबले होतं. तिच्या जन्मानंतर काही तासांनी ग्लोरिया विल्यम्सने तिची चोरी केली. पण १९ वर्षांनंतर २०१७ मध्ये हे उघड झालं की अलेक्सिसची खरी आई शनारा मोबली आहे, जी बाळाच्या जन्माच्या वेळी फक्त १६ वर्षांची होती.

तुम्हाला वाटेल की यानंतर, जेव्हा मुलीला सत्य समजलं, तेव्हा ती ग्लोरियावर रागावली असेल आणि आपल्या खऱ्या आईपासून आपल्याला दूर केल्यानं तिचा तिरस्कार करू लागली असेल. पण तसं घडलं नाही. झालं असं की १९९८ मध्ये ग्लोरिया एक परिचारिका म्हणून रुग्णालयात शिरली आणि तिने हे बाळ चोरलं. तिने बाळाला आपल्यासोबत साउथ कॅरोलिनाला नेलं आणि तिला तिच्या स्वतःच्या मुलीसारखं सांभाळलं. २०१७ मध्ये नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रनने केलेल्या तपासणीत असं आढळून आले की दक्षिण कॅरोलिना येथील अलेक्सिसची जन्मतारीख हरवलेल्या बाळाशी मिळतीजुळती आहे, परंतु तिचं नाव हरवलेल्या बाळापेक्षा वेगळं आहे. मुलीची डीएनए चाचणी केली असता ती शनारा मोबली यांची मुलगी असल्याचं स्पष्ट झालं.

त्यानंतर ग्लोरियाला तुरुंगात टाकण्यात आलं. मात्र, तेव्हापासून अलेक्सिस ग्लोरियाला तुरुंगातून सोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. ग्लोरियाला कोर्टाने १८ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे आणि आता काहीच वर्षे झाली आहेत, तिने कोर्टात शिक्षा माफ करण्याची विनंती केली आहे. ग्लोरियाने अलेक्सिसला मोठ्या प्रेमाने वाढवलं. आता अलेक्सिस २३ वर्षांची आहे आणि तिच्या खऱ्या पालकांना पुन्हा भेटली आहे, परंतु असं असूनही तिला ग्लोरियाची सुटका करायची आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिने न्यायाधीशांना पत्रही लिहिलं होतं. तिने चिठ्ठीमध्ये लिहिलेलं की ग्लोरिया तिची दुसरी आई आहे आणि ती तिच्यावर खूप प्रेम करते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके