शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! सुंदर दिसण्याच्या नादात तरुणीने केली आयब्रो ट्रीटमेंट; झाली भयंकर अवस्था अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 16:18 IST

सुंदर दिसण्याच्या नादात केलेला भलताच प्रयोग अनेकदा अंगाशी येतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे.

आपण सुंदर दिसावं यासाठी काही जण वाटेल ते करतात. यासाठी मेकअपशिवाय कॉस्मेटिक सर्जरीचाही पर्याय उपलब्ध झाला आहे. सुंदर दिसण्याच्या नादात केलेला भलताच प्रयोग अनेकदा अंगाशी येतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. छान दिसण्याच्या नादात तरुणीने आय़ब्रो ट्रीटमेंट केली पण भलताच परिणाम झाल्याची घटना आता समोर आली आहे. ट्रीटमेंटमुळे महिलेच्या चेहऱ्याला सूज आली. धक्कादायक बाब म्हणजे आकर्षक दिसण्याऐवजी ती भयंकर दिसू लागली. 

मिशेल क्लार्क (Michelle Clark) असं या तरुणीचं नाव असून आयब्रो ट्रीटमेंट घेतल्याने तिच्या चेहऱ्यावर सूज आली. आपण अजून आकर्षक आणि सुंदर दिसावं यासाठी मिशेलने आयब्रो कलर करण्याचा निर्णय घेतला. परंतु, पार्लरमध्ये तिच्याबरोबर अशी दुर्घटना घडली की यामुळे आपण जिवंत राहणार नाही, असं तिला क्षणभर वाटलं. जेव्हा ती आयब्रो वॅक्सिंग आणि कलर करून घरी परतली तेव्हा तिच्या आयब्रोमध्ये अ‍ॅलर्जी झाल्याची जाणीव झाली. काही तरी गडबड झालीय असं तिला वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर तिनं चेहरा पाहिला तेव्हा पूर्ण चेहरा सुजला होता. चेहऱ्याची वाईट अवस्था पाहून तिला मोठा मानसिक धक्का बसला.

मिशेलनं एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, "आयब्रो वॅक्सिंग आणि कलर केल्यानंतर माझ्या भुवया लालसर झाल्या होत्या आणि काही वेळातच भुवयांवरची त्वचा कोरडी पडून ती निघू लागली. त्यातून पू येऊ लागला. वॅक्सिंग आणि आयब्रोमुळे त्वचा पूर्णपणे भाजली होती. त्यामुळे त्वचेखालचं मांस दिसू लागलं होतं. चेहरा पूर्णपणे सुजला होता. आयब्रो वॅक्सिंग आणि कलर केल्यानंतर सलूनमध्येच माझ्या भुवयांची आग होऊ लागली होती. परंतु, ब्युटीशियनने त्यावर क्रिम लावलं आणि घरी जाण्यास सांगितलं. घरी आल्यानंतर माझ्या भुवया आणि जळजळ अधिकच वाढली होती. भुवयांना तीव्र खाज येत होती. त्यामुळे मला झोपही लागली नाही."

"मी दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे गेले असता त्यांनी माझ्यावर उपचार केले. मला सुमारे 3 ते 4 आठवडे भुवयांवर सुती कापड ठेवावं लागलं. त्यानंतर सुमारे 8 ते 10 आठवड्यांनी माझ्या चेहऱ्याची आणि भुवयांची स्थिती सुधारली. हा अनुभव माझ्यासाठी खूप भयानक होता. हा प्रसंग अन्य कोणत्याही महिलेवर ओढवू नये. महिलांनी नेहमीच प्रोफेशनल आयब्रो प्रॅक्टिशनर कडून ट्रीटमेंट घ्यावी किंवा मेकओव्हर करावा. अन्यथा अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. मला वेळेत उपचार मिळाल्यानं मी स्वतःला नशीबवान समजते" असं म्हणत मिशेलने आपला भयंकर अनुभव शेअर केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके