11 वर्षापासून दुखत होतं महिलेचं पोट, रिपोर्टमध्ये दिसली अशी वस्तू डॉक्टरही झाले हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 01:25 PM2023-04-25T13:25:29+5:302023-04-25T13:25:49+5:30

या महिलेचं नाव आहे मारिया. जी 4 मुलांची आई आहे. गेल्या 11 वर्षापासून तिच्या पोटत दुखत होतं. आधी ती या दुखण्याला सामान्य मानत होती.

Woman has a needle and thread stuck inside was pain for 11 years | 11 वर्षापासून दुखत होतं महिलेचं पोट, रिपोर्टमध्ये दिसली अशी वस्तू डॉक्टरही झाले हैराण!

11 वर्षापासून दुखत होतं महिलेचं पोट, रिपोर्टमध्ये दिसली अशी वस्तू डॉक्टरही झाले हैराण!

googlenewsNext

Woman has a needle and thread stuck inside : जर मनष्याचं आरोग्य चांगलं राहिलं तर आपोआप जीवनात चांगल्या गोष्टी घडतात. पण अनेकदा बेजबाबदारपणाच्या अशा काही घटना समोर येत असतात, ज्यामुळे व्यक्तींना आपल्या चुकांची किंमत अनेक वर्ष चुकवावी लागते. आज आम्ही एक अशाच महिलेची कहाणी सांगणार आहोत, 11 वर्षापासून तिचं पोट दुखत होतं.

या महिलेचं नाव आहे मारिया. जी 4 मुलांची आई आहे. गेल्या 11 वर्षापासून तिच्या पोटत दुखत होतं. आधी ती या दुखण्याला सामान्य मानत होती. पण जेव्हा हे दुखणं वाढलं तेव्हा ती डॉक्टरांकडे गेली. इथे तिचा एमआरआय करण्यात आला. या रिपोर्टमध्ये जे दिसलं ते पाहून डॉक्टरही हैराण झाले. तिच्या पोटात सूई आणि धागा होता.

कोलंबियाची राहणारी मारिया एडेरलिंडा फोरेरोचं वय 39 वर्षे आहे. 4 मुलांना जन्म दिल्यानंतर तिने ऑपरेशन केलं. जेणेकरून आणखी मुलं होऊ नयेत. या ऑपरेशननंतर तिला अनेक वर्ष पोटात दुखत होतं. जेव्हा याबाबत तिने डॉक्टरांकडे तक्रार केली तेव्हा डॉक्टरांनी तिला पेनकिलर दिल्या. तिने सांगितलं की, पोटात इतकं दुखत असे की, ती रात्रभर झोपू शकत नव्हती. 11 वर्ष तिने याकडे दुर्लक्ष केलं. कारण ती गावात राहते आणि डॉक्टर त्यांच्यापासून दूर अंतरावर असतात.

शेवटी तिला अल्ट्रा साउंड आणि एमआरआय स्कॅन करण्यास सांगण्यात आलं. जेव्हा रिपोर्टमध्ये सुई आणि धागा दिसला तर डॉक्टरही हैराण झाले. जवळपास 4000 दिवसांपासून हा सुई-धागा तिच्या पोटात होता आणि यामुळेच तिला पोटात दुखत होतं. जेव्हा तिने ऑपरेशन केलं होतं, तेव्हा हा सुई-धागा डॉक्टरांच्या चुकीमुळे तिच्या पोटातच राहिला होता. 

Web Title: Woman has a needle and thread stuck inside was pain for 11 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.