३० वर्षांनंतर प्रथमच हाताची नखे कापली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 05:49 AM2021-04-09T05:49:24+5:302021-04-09T05:49:50+5:30

गिनीजमध्ये नोंदला होता विक्रम

Woman with Guinness World Record for Longest Fingernails Cuts Them after 30 Years | ३० वर्षांनंतर प्रथमच हाताची नखे कापली

३० वर्षांनंतर प्रथमच हाताची नखे कापली

Next

टेक्सास : हातांच्या बोटांची सर्वांत लांब नखे वाढवल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नाव नोंदवलेल्या अयान्ना विल्यम्स यांनी ३० वर्षांत प्रथमच ती कापली आहेत. २०१७ मध्ये विल्यम्स यांच्या नखांची लांबी १९ फूट आणि १०.९ इंच एवढी झाली तेव्हा त्यांनी विक्रम मोडला. विल्यम्स यांना नखांची निगा राखण्यासाठी जवळपास दोन बाटल्या पॉलिश (नखांची) लागायची. गेल्या आठवड्यात त्यांनी नखे काढली. त्याआधी त्यांच्या नखांची लांबी होती २४ फूट ०.७ इंच. त्यामुळे त्यांनी स्वत:चाच विक्रम मोडला, असे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसने म्हटले. टेक्सास येथील फोर्थ वर्थमधील ट्रिनिटी व्हिस्टा डर्माटोलॉजीचे डॉ. ॲल्लीसन रिडिंजर यांनी इलेक्ट्रिक रोटरी उपकरणाने ही नखे कापली. नखे कापताना त्यांच्या भावना दाटून आल्या होत्या. “काही दशके मी ही नखे वाढवत आली आहे. मी आता नव्या आयुष्यासाठी तयार आहे. मी नखे गमावणार आहे याची मला कल्पना आहे; पण आता त्यांची जाण्याची वेळ आली आहे,” अशा शब्दांत अयान्ना विल्यम्स यांनी भावना व्यक्त केल्या होत्या, असे गिनीस वर्ल्ड रेकॉर्डसने म्हटले. 

Web Title: Woman with Guinness World Record for Longest Fingernails Cuts Them after 30 Years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.