शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

15 वर्षाच्या संसारानंतर पतीला 'भाऊ' बनवलं, पत्नीने दुसऱ्यासोबत केलं लग्न आणि आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 15:45 IST

एका महिलेने लग्नाच्या काही वर्षांनंतर आपल्या पतीला भाऊ बनवलं. नंतर एका दुसऱ्या एका व्यक्तीसोबत लग्न केलं, जिथे तिघेही होते.

पती-पत्नीचं नातं एक खास नातं असतं. दोघेही लग्नावेळी आयुष्य सोबत घालण्याची शपथ घेतात. सुख-दुख:त एकमेकांची साथ देण्याचा निश्चय करतात. पण तुम्ही कधी ऐकलंय का की, एखाद्या पती-पत्नीने आपलं नातं बदललं आणि ते भाऊ-बहीण झाले? अशी एक घटना अमेरिकेतून समोर आली आहे. इथे एका महिलेने लग्नाच्या काही वर्षांनंतर आपल्या पतीला भाऊ बनवलं. नंतर एका दुसऱ्या एका व्यक्तीसोबत लग्न केलं, जिथे तिघेही होते.

द सन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार टेक्सासमध्ये राहणारी क्रिसची कहाणी हैराण करणारी आहे. 16 वर्षाची असताना क्रिसची एका ब्रॅंडन नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली होती. दोघेही 90च्या काळातील प्रेम जगत होते, एकमेकांना पत्र पाठवत होते. आवडत्या गाण्यांची सीडी पाठवत होते आणि बीचवर फिरायला जात होते. काही वर्षानी ऑगस्ट 2006 मध्ये त्यांनी लग्न केलं. तेव्हा क्रिस 22 वर्षांची होती. सगळंकाही स्वप्नवत वाटत होतं. पण जेव्हा स्वप्न तुटतं तेव्हा फार वाईट वाटतं.

'भाऊ' बनला पती

क्रिससोबतही असंच काहीसं घडलं. लग्नाच्या दोन वर्षानी म्हणजे जेव्हा ती 24 वर्षांची होती तेव्हा पती ब्रॅंडनचा एक भीषण अपघात झाला. त्याचा जीव तर वाचला, पण तो दोन महिने कोमात होता. कोमातून बाहेर आल्यावर अनेक महिने त्याची थेरपी सुरू होती. त्याच्या मेंदुला इजा झाली असल्याने तो व्हीलचेअरवर अवलंबून होता आणि रोजची कामे करण्यासाठी त्याला क्रिसची मदत लागत होती. हळूहळू क्रिसच्या मनात ब्रॅंडनसाठी प्रेमाच्या भावनेपेक्षा सेवाभाव जास्त वाढला. ब्रॅंडनलाही तिच्यात पत्नीऐवजी बहीण दिसू लागली. त्याने टिकटॉकवर एका व्हिडिओत सांगितलं की, त्याच्यासाठी या नात्याला भाऊ-बहिणीचं नातं माननं जास्त चांगलं होतं.

पत्नीने सुरू केलं ऑनलाईन डेटिंग

दोघांच्याही भावनांमध्ये बदल झाले होते, पण क्रिस नेहमीच ब्रॅंडनसाठी उपलब्ध होती. अपघाताच्या साधारण 2 वर्षानंतर तिला असं वाटलं की, आता तिला या स्थितीत आणखी रहायचं नाहीये. तिला जीवनात पुढे जायचं आहे. पण ब्रॅंडनला तिला मागे सोडायचं नव्हतं. ब्रॅंडनलाही यावर काही आक्षेप नव्हता. कारण त्यालाही माहीत होतं की, क्रिसला परिवार आणि मुलंही हवी आहेत. दोघेही प्रेम संबंधात नव्हते, पण क्रिस त्याची काळजी घेत होती. तसेच त्याची लीगल गार्डीयनही होती. 2014 मध्ये क्रिसने ऑनलाइन डेटिंग सुरू केली आणि तिची भेट जेम्ससोबत झाली.जेम्स एक सिंगल फादर होता. त्यामुळे त्यालाही क्रिसच्या समस्या माहीत होत्या. त्याला यावर काहीच आक्षेप नव्हता की, त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहूनही तिला आपल्या पतीची काळजी घ्यायची होती. दोन्ही पुरूष एकमेकांना भेटले आणि त्यांना चांगलंही वाटलं. 

द सननुसार, हे तर समजू शकलं नाही की, क्रिस आणि ब्रॅंडनने घटस्फोट कधी घेतला. पण क्रिसने जेम्ससोबत लग्न केलं आणि तिच्या आधीच्या पतीने यात तिला साथ दिली. आता ब्रॅंडन, जेम्स आणि क्रिस सोबत राहतात. त्यांच्यात चांगलं नातं आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिपAmericaअमेरिका