नशीबवान! 661 रुपये खर्च करून महिला झाली 5 कोटींची मालकीण; पतीचा बसला नाही विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 13:08 IST2022-12-30T13:00:37+5:302022-12-30T13:08:06+5:30
डोनाला खरंच लॉटरी लागली होती आणि ती एका झटक्यात करोडपती झाली.

फोटो - आजतक
कोणाचं नशीब कधी, कुठे आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एक महिला बिस्किट आणण्यासाठी मार्केटमध्ये गेली होती. पण जेव्हा ती परत आली तेव्हा तब्बल पाच कोटींची मालकीण झाली होता. फक्त 661 रुपये खर्च करून ती करोडपती झाली आहे. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये ही घटना घडली आहे. द मिररने दिलेल्या वृत्तानुसार, डोना डेंटन नावाची महिला फ्रेमोंट फूड मार्टमध्ये बिस्किट खरेदी करायला गेली होती.
महिलेला तेव्हा बिस्किटांसोबतच ल़ॉटरीचं तिकीट खरेदी करावसं वाटलं. त्यामुळे तिने 777 लॉटरीचं एक तिकीट देखील घेण्याचा निर्णय घेतला. डोनाने आठ डॉलर म्हणजेच 661 रुपयांत लॉटरीचं तिकीट घेतलं. तिने जेव्हा तिकीट चेक केला तेव्हा धक्काच बसला. तिला 700000 पाऊंड म्हणजेच 5 कोटी 78 लाखांचा विशाल जॅकपॉट लागला. ती घाईघाईत घरी आली आणि तिने पतीला पुन्हा एकदा तिकीट चेक करायला सांगितलं.
डोनाला चार कोटी 11 लाख मिळणार
पतीने लॉटरी ऑफिसशी संपर्क केला आणि नंबर सांगितला तेव्हा तो हैराण झाला. पहिल्यांदा त्याचा विश्वासच बसला नाही. पण डोनाला खरंच लॉटरी लागली होती आणि ती एका झटक्यात करोडपती झाली. टॅक्स गेल्यानंतर डोनाला चार कोटी 11 लाख मिळणार आहे. यामुळे ख्रिसमसचा आनंद द्विगुणित झाल्याचं डोनाने म्हटलं आहे. तसेच हा आम्ही खूप जास्त खूश असून हा आशीर्वाद असल्याचं तिने म्हटलं आहे. तसेच ती यातले काही पैसे चर्चला देखील देणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"