शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खतरनाक ट्विस्ट! लग्नाच्या दिवशी नवरदेवाला समजलं, नवरी त्याची बहीण आहे आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 12:36 IST

लग्नातील या घटनेची कल्पना स्वप्नातही कुणी केली नसेल. लग्नात मुलाच्या आईची नजर तिच्या होणाऱ्या सूनेच्या हातावर पडली आणि ते थक्क झाली.

लग्नात नेहमीच काहीना काही विचित्र घडत असतं. कधी भांडणं होतात तर कधी रूसवे-फुगवे होतात. कधी कधी तर विचित्र कारणांवरून लग्नही मोडतात. मात्र, चीनमधून एका लग्नातील सर्वात वेगळी अन् भावूक करणारी घटना समोर आली आहे. या घटनेची कल्पना स्वप्नातही कुणी केली नसेल. लग्नात मुलाच्या आईची नजर तिच्या होणाऱ्या सूनेच्या हातावर पडली आणि ते थक्क झाली. इतकेच नाही तर मुलाची आई जोरजोरत रडू लागली.

झालं असं की, ज्या कपलचं लग्न होणार होतं ते भाऊ-बहीण निघाले. जेव्हा महिलेने नवरीच्या हातावर जन्मावेळी असलेलं एक निशाण पाहिलं तेव्हा तिने लगेच आपल्या मुलीला ओळखलं. सांगितले जात आहे की, ही घटना जिआनग्सू प्रांतातील सोझोउची आहे आणि हे लग्न ३१ मार्चला होत होतं. (हे पण वाचा : ठरलं तर! अडीच फूट उंचीच्या अजीमला मिळाली नवरी, वाचा काय करते मुलगी आणि बघा तिचा फोटो!)

चीनी मीडियात या घटनेवरून भरभरून चर्चा होत आहे. जेव्हा मुलाच्या आईने नवरीला तिच्या हातावरील निशाणी पाहून तिच्या आई-वडिलांबाबत विचारलं. तर तिने सांगितले की, तिला तिच्या आई-वडिलांनी २० वर्षांपूर्वी दत्तक घेतलं होतं. त्यांना ती रस्त्याच्या कडेला पडलेली सापडली होती. (हे पण वाचा : वाह! इलेक्ट्रीक सायकलवर वरात अन् तुळशीची वरमाला; असा पार पडला ‘ईको फ्रेंडली लग्नसोहळा, पाहा फोटो)

या खुलाशानंतर मुलगी तिच्या आईला मिठी मारून  जोरजोरात रडू लागली आणि आपल्या बायोलॉजिकल आई-वडिलांबाबत विचारू लागली. पण या कहाणीत ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा लग्न मोडलं नाही. नवरी-नवरदेव दोघेही भाऊ बहीण असल्याचं समोर आलं तरी सुद्धा हे लग्न मोडलं नाही. कारण नवरदेवाला सुद्धा दत्तक घेतलं गेलं होतं. आणि नवरीच्या खऱ्या आईला या लग्नावरून काहीच अडचण नव्हती.

असे म्हणतात की, नशीब फारच विचित्र खेळ खेळतं. स्थानिक मीडियानुसार, २० वर्षाआधी जेव्हा या महिलेची मुलगी हरवली होती तेव्हा खूप प्रयत्न करूनही मुलगी सापडली नाही तर तिने एक मुलगा दत्तक घेतला होता. आता त्याच मुलासोबत तिच्या मुलीचं लग्न झालं आहे. कारण ते दोघेही बायोलॉजिकल भाऊ-बहीण नाहीत. या लग्नाला आलेले पाहुणेही हा सगळा प्रकार पाहूण भावूक झाले आणि त्यांनी आई-मुलीला शुभेच्छा दिल्या. 

टॅग्स :chinaचीनmarriageलग्नInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके