या अवलियाचा हाय हिल्स स्टंट पाहून म्हणाल, हा असला कसला स्टंटबाज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 17:09 IST2020-02-23T16:57:58+5:302020-02-23T17:09:55+5:30
या व्हिडीयोत उलडी उडी मारण्याचा हा व्यक्ती प्रयत्न करत आहे.

या अवलियाचा हाय हिल्स स्टंट पाहून म्हणाल, हा असला कसला स्टंटबाज!
अमेरिकन अभिनेता आणि रॅपर विल स्मिथ याने २० फेब्रुवारीला इन्स्टाग्रामवर व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये त्याने जो स्टंट केला आहे ते पाहून तुमची नक्की झोप उडेल. हिल्सच्या सॅण्डल घालून हा माणूस स्टंट करत आहे. हा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. उलडी उडी मारण्याचा प्रयत्न ही व्यक्ती करत आहे.
त्याला उडी मारताना पाहून बघत असलेल्या लोकांना भीती वाटत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कंमेंट्स सुद्धा केल्या आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीयोवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
१२.६ मिलियनपेक्षा अधिक व्हिव्ज या व्हिडीयोला आहेत . तसंच ६२ हजारांपेक्षा जास्त कंमेट्स आहेत. अनेकांनी त्याच्या हाय हिल्स पाहून टिकटॉक टिकटॉक असं म्हटलं आहे.