अरे देवा! "पतीसाठी हव्यात 3 गर्लफ्रेंड, मी कोणाशीच भांडणार नाही"; पत्नीने दिली हटके जाहिरात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 12:27 PM2022-08-04T12:27:36+5:302022-08-04T12:35:14+5:30

बायकोच आपल्या नवऱ्यासाठी एक, दोन नव्हे तर 3 गर्लफ्रेंड शोधत असल्याची घटना घडली आहे.

wife hires woman for husband gave 32 thousand rs salary physical relation mistress | अरे देवा! "पतीसाठी हव्यात 3 गर्लफ्रेंड, मी कोणाशीच भांडणार नाही"; पत्नीने दिली हटके जाहिरात

अरे देवा! "पतीसाठी हव्यात 3 गर्लफ्रेंड, मी कोणाशीच भांडणार नाही"; पत्नीने दिली हटके जाहिरात

googlenewsNext

पती-पत्नीमध्ये अनेकदा छोट्या, छोट्या गोष्टींवरून वाद होत असतात. कधी कधी काही वाद हे टोकाला देखील जातात. अनेकदा दोघांमध्ये येणारी तिसरी व्यक्ती या सगळ्यासाठी कारणीभूत असते. असं असताना एक भन्नाट घटना समोर आली आहे. बायकोच आपल्या नवऱ्यासाठी एक, दोन नव्हे तर 3 गर्लफ्रेंड शोधत असल्याची घटना घडली आहे. पतीच्या आनंदासाठी तिने हा पुढाकार घेतला असून पत्नीने याची एक भन्नाट जाहिरात दिली आहे. सध्या सोशल मीडियावर याची तुफान चर्चा रंगली आहे. 

जाहिरात देऊन महिलेने आपल्या पतीसाठी तीन गर्लफ्रेंड शोधण्याची घोषणा केली आहे. सध्या तिने एका गर्लफ्रेंडची भरतीही केली असून अजून दोन पोस्ट या खाली असल्याचं म्हटलं आहे. 44 वर्षीय पत्थीमाने जाहिरात देऊन ही घोषणा केली होती. त्यानंतर ती आता अशा महिलांचा शोध घेत आहे, ज्या तिच्या पतीला खूश ठेवतील आणि त्याला त्याच्या कामान मदत करतील. या बदल्यात ती गर्लफ्रेंडसना महिन्याला 32 हजार रुपये पगार देणार आहे. 

Thaiger च्या एका रिपोर्टनुसार, पत्थीमाने याबाबत टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने पती, मुलं आणि घराची देखभाल करणाऱ्या महिलांचा शोध घेतल्याचं म्हटलं आहे. पत्थीमाने दिलेल्या माहितीनुसार, अप्लाय करणाऱ्या महिलांची HIV टेस्ट होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांचं वय 30-35 वर्षांदरम्यान असावं. त्यांच्याकडे डिग्री असावी. तसेच त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय मोफत असेल. तिची ही अनोखी ऑफर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 

पत्थीमा डिप्रेशनचा सामना करत आहे त्यामुळे ती आपल्या पतीला खूश ठेवू शकत नाही. पत्थीमाने व्हिडीओमध्ये तिच्या कुटुंबात आता पतीसोबत छोटी पत्नी देखील सहभागी झाल्याचं म्हटलं आहे. एकत्रच एकाच घरात राहू, एकमेकांची काळजी घेऊ असं म्हटलं आहे. तसेच मी गॅरंटी देते की आमच्यात कोणतचं भांडण होणार नाही असंही सांगितलं. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी हा पत्थीमाचा फेमस होण्यासाठी स्टंट असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: wife hires woman for husband gave 32 thousand rs salary physical relation mistress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.