शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

हेच राहिलं होतं! कोरोना पॉझिटिव्ह पतीला किडनी देण्यास पत्नीचा नकार, म्हणाली - आधी संपत्ती नावे करा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 15:15 IST

हे भांडण इतकं वाढलं की, लोक एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारत होते. याप्रकरणी कुणीही पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही.

राजस्थानच्या भरतपूर जिल्हा आरबीएम हॉस्पिटलमधील कोविड-१९ वार्डात रूग्णाच्या नातेवाईकांमध्ये जोरदार भांडण झाल्याची घटना समोर आली आहे. हे भांडण इतकं वाढलं की, लोक एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारत होते. याप्रकरणी कुणीही पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तो तीन दिवसाआधीचा असल्याचं सांगितलं जात आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, धानोता गावातील रूपकिशोरची किडनी खराब आहे आणि अशात त्याला कोरोनाचीही लागण झाली होती. त्याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयाच्या कोविड वार्डात दाखल केलं गेलं होतं. नातेवाईक रूग्णाच्या पत्नीला सांगत होते की, तून त्याला किडनी दे. जेणेकरून त्याचा जीव वाचेल. मात्र, पत्नीने किडनी देण्यास नकार दिला. पत्नी म्हणाली की, ती किडनी तेव्हाच देईल जेव्हा रूपकिशोर सर्व संपत्ती तिच्या नावावर करेल. (हे पण वाचा : वाह रे वाह! पठ्ठयाने चक्क शरीरसंबंधासाठी केली ई-पासची मागणी, पोलिसांनी उचलून आणलं तर दिलं हे स्पष्टीकरण...)

यावरूनच गेल्या काही दिवसांपासून पत्नी आणि नातेवाईकांमध्ये भांडण सुरू होतं. गेल्या सोमवारी पत्नीच्या माहेरचे लोक कोविड-१९ वार्डात आले आणि रूपकिशोरच्या नातेवाईकांसोबत त्यांनी भांडण सुरू केलं. यादरम्यान दोन्हीकडील लोकांनी एकमेकांना चांगलीच मारामारी केली. दोन्हीकडील लोकांनी तिथे असलेल्या टेबल फॅनने एकमेकांना मारलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (हे पण वाचा : चितेवर अचानक उठून बसला मृतदेह, अंत्यसंस्काराआधी स्मशानभूमीत एकच गोंधळ...)

जिल्हा रूग्णालयाचे पीएमओ डॉ. जिज्ञासा साहनीने सांगितले की, वार्डात रूग्णाचे नातेवाईक घुसले होते आणि दोन्हीकडील लोकांमध्ये जोरदार मारमारी झाली. ज्यात स्टाफलाही मारहाण झाली. ते म्हणाले की यात वार्डाबाहेर तैनात सुरक्षा रक्षकांची चूक आहे ज्यांनी लोकांना आत येऊ दिलं. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानJara hatkeजरा हटकेcorona virusकोरोना वायरस बातम्या