सहलीला न जाता घरीच राहिला 'आजारी' पती; CCTV पाहून पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 17:08 IST2021-12-20T17:08:33+5:302021-12-20T17:08:55+5:30
एका सीसीटीव्हीमुळे नवऱ्याचं बिंग फुटलं; सत्य समोर येताच महिलेला जबर धक्का

सहलीला न जाता घरीच राहिला 'आजारी' पती; CCTV पाहून पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली
एका महिलेनं पतीला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहात पकडलं आहे. महिलेनं कुटुंबासोबत सहलीला जाण्याची योजना आखली होती. मात्र तिचा पती घरीच थांबला होता. आजारी असल्याचं सांगत तो घरीच राहिला. त्यामुळे त्याची पत्नी एकटीच सहलीला गेली. मात्र सहलीवरून परतताच तिच्या पायाखालची वाळू सरकली.
सहलीवरून परतल्यानंतर महिलेनं घराचं सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिलं. त्यातून पतीचं कृष्णकृत्य उजेडात आलं. डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार, एका महिलेनं टिकटॉकच्या माध्यमातून पतीबद्दल आलेला कटू अनुभव सांगितला. तिनं व्हिडीओच्या माध्यमातून स्वत:ची कैफियत मांडली. महिलेनं घराचं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं. त्यात तिला पती एका महिलेसोबत असल्याचं दिसलं. पती दरवाज्यात उभा आहे आणि त्याच्या मागे असलेल्या खोलीतून एक महिला कमी कपडे घालून बाहेर येत आहे, असं दृश्य तिला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं.
पती आणि त्याची प्रेयसी काही वेळ दरवाज्याजवळ किस करतात. गळाभेट घेतात. त्यानंतर महिला बाय म्हणून निघून जाते. हा संपूर्ण प्रकार डोअर बेलला असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सहलीवरून परतताच महिलेनं सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिलं. त्यामुळे महिलेचं बिंग फुटलं. विशेष म्हणजे हा कॅमेरा पतीनंच लावला होता. मात्र त्याच कॅमेऱ्यानं त्याचं पितळ उघडं पाडलं.