रात्री ऐकू येऊ लागले विचित्र आवाज, बायको गायब; सीसीटीव्ही पाहताच नवऱ्याला जबर धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 16:15 IST2021-08-20T16:15:38+5:302021-08-20T16:15:50+5:30

सीसीटीव्ही फुटेज पाहताच बिंग फुटलं; रहस्य उलगडलं

wife affair with neighbor secret revealed from cctv footage in front of husband | रात्री ऐकू येऊ लागले विचित्र आवाज, बायको गायब; सीसीटीव्ही पाहताच नवऱ्याला जबर धक्का

रात्री ऐकू येऊ लागले विचित्र आवाज, बायको गायब; सीसीटीव्ही पाहताच नवऱ्याला जबर धक्का

लग्नानंतर महिलेला शेजारी राहणारा पुरुष आवडू लागला. पतीला अंधारात ठेवून अनेकदा ती रात्री शेजाऱ्याला भेटायला जायची. एकदा पतीनं सीसीटीव्ही पाहिलं, तेव्हा त्याला ही गोष्ट समजली आणि जबर धक्का बसला. मी तुला कधीही माफ करणार नाही, असं पतीनं पत्नीला ठणकावून सांगितलं. मात्र त्यावर तिनं दिलेल्या उत्तरानं पती गप्प झाला.

द सननं दिलेल्या वृत्तानुसार, पत्नीनं दगा दिल्यानं पती तणावाखाली आहे. पत्नी असं वागेल याचा विचारही त्यानं केला नव्हता. विशेष म्हणजे शेजारी राहणारा त्याचा चांगला मित्र असून तो विवाहित आहे. एका रात्री सीसीटीव्हीतील फुटेज तपासल्यावर या सगळ्याचा उलगडा झाला. 

एकदा रात्री झोपला असताना पतीला काही विचित्र आवाज ऐकू येऊ लागले. तो घाबरला. घरात चोर शिरल्याचा संशय आल्यानं त्यानं सीसीटीव्ही तपासले. त्यातील दृश्य पाहन त्याला धक्का बसला. त्याची पत्नी शेजारी राहणाऱ्या त्याच्या मित्राला किस करत असल्याचं त्याला सीसीटीव्हीत दिसलं. त्यानं याबद्दल पत्नीकडे विचारणा केली. पत्नी माफी मागेल, अशी आशा त्याला होती. मात्र तिनं शेजाऱ्यावर माझं प्रेम असून मला तुझ्यासोबत राहायचं नाही, असं स्पष्ट सांगितलं.

गेल्या अनेक महिन्यांपासून शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत वेळ घालवत असल्याचं तिनं पतीला सांगितलं. शेजाऱ्यासोबतची अफेअरसाठी तिनं पतीलाच जबाबदार धरलं. लग्नानंतर पती बदलला. तो आधीसारखं प्रेम करायचा नाही. काळजी घ्यायचा नाही. त्यामुळेच मी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडले. असं म्हणत पत्नीनं पतीलाच दोषी ठरवलं.

Web Title: wife affair with neighbor secret revealed from cctv footage in front of husband