दारूच्या ग्लासला पेग(Peg) का म्हटलं जातं? तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 04:49 PM2019-10-21T16:49:45+5:302019-10-21T16:51:00+5:30

मद्य पिणाऱ्या प्रत्येकाला आणि न पिणाऱ्यांना सुद्धा 'पेग' हा शब्द चांगलाच माहीत असेल. याच पेगचा आता पेक असा उच्चार केला जातो. सामान्यपणे भारतात दारूलाच पेग असं म्हणतात.

Why wine glass called peg? | दारूच्या ग्लासला पेग(Peg) का म्हटलं जातं? तुम्हाला माहीत आहे का?

दारूच्या ग्लासला पेग(Peg) का म्हटलं जातं? तुम्हाला माहीत आहे का?

Next

(Image Credit : tourismwinnipeg.com)

मद्य पिणाऱ्या प्रत्येकाला आणि न पिणाऱ्यांना सुद्धा 'पेग' हा शब्द चांगलाच माहीत असेल. याच पेगचा आता पेक असा उच्चार केला जातो. सामान्यपणे भारतात दारूलाच पेग असं म्हणतात. इतकेच नाही तर मुळात भारतात हे दारू मोजण्याचं एक प्रमाण मानलं जातं. मात्र, कधी प्रश्न पडलाय की, या दारूच्या ठराविक प्रमाणाला पेग का म्हणतात? आता तुम्ही म्हणाल दारू प्यायची सोडून हे कशाला शोधत बसायचं. असो, चला आम्ही तुम्हाला या पेगला पेग का म्हणतात हे सांगणार आहोत. 

काय आहे पेग?

खरंतर पेगचा अर्थ जाणून घेण्यासाठी आपल्याला जरा परदेशात जावं लागेल. कारण हा शब्दही तेथूनच आला. हा शब्द मूळचा लंडनमधून आला. लंडनचं वातावरण फारच थंड. त्या काळात खाण कामगारांना काम संपले की खाण मालक एक ग्लास दारू देत असे. कामाचा स्ट्रेस निघून जाण्यसाठी हा दारूचा ग्लास त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा असे. हेच कामगार त्या दारुच्या ग्लासाला PRECIOUS EVENING GLASS असे म्हणत असे. याच शब्दाचे संक्षिप्त रूप P.E.G. ( PRECIOUS EVENING GLASS) हे आहे. त्यानंतर हा शब्द सर्वत्र पोहोचला झाला आणी दारूच्या ग्लासला पेग म्हणून संबोधल्या जाऊ लागले.

पटियाला पेग जन्म

'पटियाला पेग' या शब्द पटियालाचे महाराजा भूपिंदर सिंह यांची देण आहे. त्यांनी १९२० मध्ये हा शब्द वापरला. ब्रिटीशांसोबत झालेल्या एका क्रिकेट सामन्यात महाराजांनी ब्रिटीशांना चांगलीच मात दिली होती. त्या सामन्यादरम्यान 'पटियाला पेग' जन्म झाला.

असे मानले जाते की, या सामन्यातील दमदार खेळानंतर स्वत: महाजाराजांनी ग्लासात व्हिस्की भरली. ग्लासांमध्ये व्हिस्कीचं प्रमाण दुप्पट होतं. यावेळी चिअर्स करण्यासाठी कर्नल डग्लसला महाराजांनी ग्लास दिला तर या पेगबाबत त्याने महाराजांना विचारले.  तेव्हा महाराज हसत म्हणाले की,  'तुम्ही पटियालात माझे पाहुणे आहात, टोस्टसोबत 'पटियाला पेग' पेक्षा कमी काहीच नाही मिळणार'. तेव्हापासूनच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पाहुण्यांना पटिलाय पेग देण्याची प्रथा पडली.

 

Web Title: Why wine glass called peg?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.