शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
5
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
6
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
7
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
8
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
9
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
10
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
11
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
12
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
13
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
14
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
15
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
16
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
17
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
18
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
19
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
20
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!

व्हेलमाशाची 'उलटी' इतकी महाग का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 13:57 IST

इजिप्तमध्ये याचा प्राचीन काळापासून वापर केला जात आहे. चीनमध्ये हा पदार्थ ड्रॅगनच्या थुंकीमधून बाहेर येतो असा समज होता. युरोपमध्ये प्लेगच्या साथीमध्ये अ‍ॅम्बरग्रीसचे गोळे जवळ बाळगले तर प्लेगपासून रक्षण होते असे मानले जाई. मध्ययुगात युरोपमध्ये याचा वापर डोकेदुखी, सर्दी, अपस्मार यांच्यावर उपचारासाठी केला जात असे.

मुंबई- कालच व्हेल माशाची उलटी विकणाऱ्या तिघांना अटक झाली आहे. पण उलटीसारखा त्याज्य पदार्थ हे लोक का विकत असतील आणि तो कोण विकत घेत असेल याबाबत फारशी माहिती नसते. व्हेल माशाची ही उलटी म्हणजे एक दगडासारखा पदार्थ असतो. त्याला अ‍ॅम्बरग्रीस असं म्हणतात. व्हेल माशाने तो तोंडातून बाहेर फेकला की तो वाहत किनाऱ्यावर येतो. या गोळ्य़ाला जागतिक बाजारपेठेमध्ये मोठी किंमत मिळते. त्याला पांढुरका पिवळा रंग असतो. आता या गोळ्याला इतकी किंमत का असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर म्हणजे, सुगंध. या दगडासारख्या गोळ््याला कस्तुरीसारखा गोडसर वास असतो. त्यामुळे त्याचा वापर उच्च प्रतीच्या अत्तराच्या निर्मितीसाठी केला जातो. मात्र आजही ही उलटी म्हणजे नक्की काय याचा विचार संशोधक करत आहेत. व्हेल माशाच्या पित्ताशयातून विविध प्रकारची द्रव्ये त्याच्या आतड्यामध्ये जातात आणि तेथे अ‍ॅम्बरग्रीसची निर्मिती होत असावी असे समजले जाते. या पदार्थाची निर्मिती होण्यासाठी अनेक वर्षे जावी लागतात. काही शास्त्रज्ञांच्या मते स्क्वीड (एक प्रकारचा समुद्री जीव) खाल्ल्यावर त्याची चोच व्हेल माशाला टोचू लागते. त्यामुळे व्हेल मासा त्याच्याभोवती या द्रव्याचे संचयन करतो.         काही अ‍ॅम्बरग्रीसमध्ये अशा टोकदार वस्तू सापडल्या आहेत. हे सुगंधी द्रव्य बाळगणे अनेक देशांमध्ये बेकायदेशीर मानले जाते. स्पर्म व्हेलची संख्या कमी होत चालल्यामुळे ते बाळगणे बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. बहुतांशवेळा अ‍ॅम्बरग्रीसला कुत्रे शोधून काढतात त्यामुळे काही कुत्र्यांना खास प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून शोध घेतला जातो. दक्षिण अफ्रिका, ब्राझील, मादागास्कर, मालदीव, भारत, आॅस्ट्रेलिया, न्यू झीलंड, बहामा या देशांच्या किनाऱ्यावर हे सुगंधी गोळे सापडले आहेत. हा पदार्थ तयार होण्यासाठी लागणारा काळ, त्याचा सुवास, तो दुर्मिळ असणे आणि शोधायला मुश्कील असणे या कारणांमुळे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आणि किंमत मिळालेली आहे. जगभरात त्याचे लिलाव करुन लाखो डॉलर्सची किंमत वसूल केली जाते. गेली अनेक वर्षे हा पदार्थ स्पर्म व्हेलच्या तोंडाद्वारे बाहेर फेकला जाणारा पदार्थ असावा असा अंदाज होता मात्र काही तज्ज्ञांच्या मते हा गोळा त्याच्या गुदद्वारावाटे बाहेर फेकला जात असावा.    इजिप्तमध्ये याचा प्राचीन काळापासून वापर केला जात आहे. चीनमध्ये हा पदार्थ ड्रॅगनच्या थुंकीमधून बाहेर येतो असा समज होता. युरोपमध्ये प्लेगच्या साथीमध्ये अ‍ॅम्बरग्रीसचे गोळे जवळ बाळगले तर प्लेगपासून रक्षण होते असे मानले जाई. मध्ययुगात युरोपमध्ये याचा वापर डोकेदुखी, सर्दी, अपस्मार यांच्यावर उपचारासाठी केला जात असे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके