Tajmahal Tulsi : उत्तर प्रदेशाच्या आग्र्यामधील ऐतिहासिक वास्तू ताजमहाल बघण्यासाठी देश-विदेशातील हजारो लोक येतात. ताजमहालला प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. हा ताजमहाल बादशाह शाहजहॉंने पत्नी मुमताजच्या आठवणीत बांधला होता. या वास्तूबाबत अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर येत असतात. अशीच एक बाब आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तुम्ही जर ताजमहाल पाहिला असेल तर ताजमहालाच्या चारही बाजूनं भरपूर तुळशीची रोपं लावण्यात आली आहे. पण याचं कारण अनेकांना माहीत नसेल. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तुम्हाला कदाचित माहीत नसेल की, तुळशीची रोपं रोज जवळपास २० तास ऑक्सिजन आणि ४ तास ओझोन गॅस रिलीज करतं. तुळशीची रोपं साधारण १० वर्ग फूटातील हवा शुद्ध करतात. ज्यामुळे आजूबाजूला कोणतेही कीटक येत नाहीत.
ताजमहालच्या आजूबाजूला लावलेल्या रोपांमुळे ताजमहालाची सुरक्षा होते. तुळशीच्या रोपांमधून निघणारा ओझोन गॅस सूर्याच्या नुकसानकारक किरणांपासून ताजमहालाचा बचाव करतो. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, ताजमहालचा प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी इथे जवळपास ८० हजार तुळशीची झाडं लावण्यात आली आहेत.
तसेच तुळशीची भरपूर रोपं लावण्यात आल्यामुळे ताजमहालाच्या आजूबाजूला कीटक येत नाही. ज्यामुळे ताजमहालची भींत आणि पृष्ठभाग दोन्ही साफ राहतात. तसेच तुळशीच्या रोपांमुळे ताजमहालच्या आजूबाजूची हवाही शुद्ध राहते.