शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

जीन्सच्या छोट्या पॉकेटवर धातुची बटनं का असतात? तुम्हाला माहीत आहे का कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 13:55 IST

तुम्ही कधी जीन्सच्या छोट्या पॉकेटच्या बटनांबाबत विचार केलाय का? ही बटन का दिली असतात याचं कारण माहीत आहे का?

अलिकडे तर जास्तीत जास्त लोक जीन्सच वापरतात. तुम्हीही ऑफिस, कॉलेज, घर आणि बाहेर जीन्स वापरत असालच. तरूणाईमध्ये जीन्सची क्रेझ बघायला मिळते. जीन्स स्टायलिश दिसण्यासोबतच रोज धुवावी लागत नाही. याच खासियतमुळे अनेक तरूण जीन्स घालणं पसंत करतात. पण तुम्ही कधी जीन्सच्या छोट्या पॉकेटच्या बटनांबाबत विचार केलाय का? ही बटन का दिली असतात याचं कारण माहीत आहे का? नाही ना?. तर चला जाणून घेऊ याचं रहस्य...

का लावण्यात येतात पॉकेटला छोटे बटन?

याचा इतिहास १८२९ सालाशी संबंधित आहे. लिवाइस स्ट्रॉस कंपनी नवीन होती आणि त्यावेळी लोकल खाणींमध्ये काम करणारे कामगार स्टायलिश जीन्स घालत होते. त्यादरम्यान कामगारांना फार मेहनत करावी लागत होती आणि जास्तीत जास्त मजूर याची तक्रार करायचे की त्यांच्या पॅंटचा खिसा फाटतो. अशात टेलर जेकब डेविसने या समस्येचा तोडगा काढण्यासाठी पॉकेटच्या साइडला मेटलचे छोटे छोटे बटन लावले. या बटन्सना रिवेट्स म्हटलं जातं. ज्याने जीन्सच्या पॉकेटला मजबूती मिळते. रोजची मेहनत पॉकेटवर प्रभाव पाडते आणि त्यामुळे हे रिवेट्स लावून जीन्सला थोडं मजबूत केलं गेलं. (हे पण वाचा : ऑपरेशन थिएटरमध्ये 'थिएटर' शब्दाचा वापर का केला जातो? जाणून घ्या कारण....)

तसे तर टेलर जेकबला यासाठी धन्यवाद दिले पाहिजे आणि ते याचा आपल्या नावाने पेटेंटही करणार होते. पण त्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. हेच कारण आहे की, त्यांनी १८७२ मध्ये लिवाइस कंपनीला एक पत्र लिहिलं आणि या समस्येबाबत सांगितलं. सोबतच आपल्या शोधाबाबतही सांगितलं. त्यामुळे नंतर जीन्सच्या पॉकेटला कॉपरचे बटन लावण्यात आले. आणि लिवाइस कंपनीने जेकबला आपल्या कंपनीत प्रॉडक्शन मॅनेजर बनवलं.

अखेर का असतं जीन्समध्ये छोटं पॉकेट 

तुम्ही नेहमीच पाहिलं असेल की, जीन्सला एक छोटं पॉकेटही असतं आणि यात वेगवेगळ्या वस्तू जसे की, पेन ड्राइव्ह इत्यादी ठेवण्यासाठी वापरला जातो. पण जुन्या काळात याचा वापर पॉकेट वॉच ठेवण्यासाठी केला जात होता. पॉकेट वॉचमुळेच ते पॉकेट लहान ठेवण्यात आलं होतं. जेणेकरून त्यात पॉकेट वॉच फिट बसेल. आता तर जीन्सच्या पॉकेटवरील बटन किंवा छोटं पॉकेट दोन्हीही फॅशन स्टेटमेंट बनले आहेत.  

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके