काय आहे हे Sea Cucumber ज्याची किंमत आकाशाला भिडते आणि भारतात का आहे यावर बंदी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 12:23 PM2021-09-21T12:23:51+5:302021-09-21T12:31:49+5:30

चीनमधील लोक हे जीव आवडीने खातात. ते हे जीव वाळवून खातात. याला त्रेपांग असं म्हणतात. यांचा वापर औषध तयार करण्यासाठीही केला जातो.

Why this Sea cucumber are so expensive | काय आहे हे Sea Cucumber ज्याची किंमत आकाशाला भिडते आणि भारतात का आहे यावर बंदी?

काय आहे हे Sea Cucumber ज्याची किंमत आकाशाला भिडते आणि भारतात का आहे यावर बंदी?

googlenewsNext

काकडी तर तुम्ही अनेकदा खाल्ली असेल. पण Sea Cucumbers म्हणजे समुद्री काकडीबाबत तुम्ही कदाचित ऐकलं नसेल. ज्या समुद्री काकडीबाबत आम्ही सांगतोय तो काही फळ किंवा भाजी नाही तर एक समुद्री जीव आहे.या जीवाचं नाव समुद्री काकडी पडलं कारण त्याची स्कीन मुलायम असते आणि ट्यूबसारखं शरीर आहे. हा जीव  बराचसा काकडीसारखा दिसतो. हे जीव समुद्रातील अॅसिडिटी कमी करण्यासाठी फार फायदेशीर असतात. तसेच समुद्री इको सिस्टमसाठीही हे महत्वाचे मानले जातात.

चीनमधील लोक हे जीव आवडीने खातात. ते हे जीव वाळवून खातात. याला त्रेपांग असं म्हणतात. यांचा वापर औषध तयार करण्यासाठीही केला जातो. येथील श्रीमंत लोक हे जीव अनेक वर्षांपासून खात आले आहेत. समुद्री काकडीची एक जपानी प्रजाती सर्वात महागडी विकली जाते. याची किंमत २.५ लाख रूपये प्रति किलोपर्यंत असते. चीनमध्ये मानलं जातं की, समुद्री काकडीत अनेक औषधी गुण आहेत.

दक्षिण पूर्व आशियातील अनेक देशांमध्ये या जीवांचा वापर सांधेदुखीच्या समस्येसाठी केला जातो. नुकताच यूरोपमधील लोकांनीही याचा वापर औषध म्हणून सुरू केला आहे. आता औषधी तयार करणाऱ्या कंपन्याही समुद्री काकडीपासून औषध तयार करण्यावर काम करत आहेत.

१९८० दरम्यान चीनमध्ये या जीवांची मागणी फारच वाढली होती. आधी केवळ श्रीमंत चीनी लोकच हे खाऊ शकत होते. पण नंतर मध्यम वर्गातील लोकही याचं सेवन करू लागले होते. दक्षिण आशियातील काही देशांसहीत चीनमध्ये याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आणि सोबतच या जीवांची संख्याही कमी झाली.

मागणी वाढल्यामुळे अनेक देशांनी या जीवांची निर्यात मोठ्या प्रमाणात केली. १९९६ ते २०११ दरम्यान समुद्री काकडीची निर्यात करणाऱ्या देशांची संख्या ३५ हून ८३ झाली होती. मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने आता या जीवांना लुप्त होणाऱ्या जीवांच्या यादीत टाकलं.

अनेक देशांनी हे जीव पकडण्यावर बंदी घातली आहे. Wildlife Protection Act, 1972 नुसार, भारत समुद्री काकडीला लुप्त होणारा जीव मानतो आणि त्यामुळे याच्या विक्रीवर तसेच निर्यातीवर बंदी घातली आहे. बंदी असल्याने या जीवाची स्मगलिंग वाढत आहे. खासकरून हे प्रकार भारत आणि श्रीलंकेच्या समुद्री भागात होतात.

फेब्रवारी २०२० मध्ये लक्षद्वीपमध्ये समुद्री काकडीसाठी जगातलं पहिलं संरक्षण क्षेत्र बनवलं. या समस्येला दूर करण्यासाठी लक्षद्वीपमद्ये Anti-Poaching Camps ही बनवण्यात आले आहे. कालच भारतीय कोस्ड गार्डने समुद्री काकडीची एक खेप पकडली आहे. ज्याची किंमत अंदाजे ८ कोटी रूपये आहे.
 

Web Title: Why this Sea cucumber are so expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.