विमानात बसून प्रवास करण्याची अनेकांची इच्छा असते. हवाई सुंदरींव्यतिरिक्त विमानाबाबतच्या वेगवेगळ्या रोमांचक गोष्टीही जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. आज आम्ही तुम्हाला विमानाबाबत अशाच काही रोमांचक गोष्टी सांगणार आहोत, ज्या वाचून तुम्ही अवाक् व्हाल.
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, विमान प्रवासादरम्यान लोक जास्त गॅस सोडतात. त्यामुळे विमानातील दुर्गंधी कमी करण्यासाठी कोळाशाच्या फिल्टरचा वापर केला जातो.
विमान प्रवासादरम्यान आपली जेवणाची टेस्ट बदलते. कारण एअरलाइन्समध्ये देण्यात आलेल्या अन्नात जास्त मीठ टाकलेलं असतं. पण विमानाच्या दबावामुळे जास्त मीठ असल्याचं आपल्या खाताना लक्षात येत नाही.
विमान प्रवासात इमरजन्सीवेळी प्रवाशांना ऑक्सिजन मास्क दिले जातात. हे तुम्हालाही माहीत असेलच. पण याची दुसरी बाजू म्हणजे या मास्कच्या माध्यमातून तुम्ही केवळ १५ मिनिटेच ऑक्सिजन घेऊ शकता.
१९५३ च्या आधी विमानाच्या खिडक्या चौकोणी आकाराच्या असायच्या. पण एका दुर्घटनेनंतर खिडक्यांचा आकार गोल किंवा अंडाकृती केला गेला. कारण गोल आकाराच्या खिडक्यांचे कॉर्नर हवेला जास्त विरोध करत नाही. त्यामुळे विमानावरही जास्त दबाव पडत नाही.
असे म्हटले जाते की, १९८७ मध्ये एका व्यक्तीने एका एअरलाइनची आजीवन पास काढली होती. यासाठी त्याने ६९ लाख रूपये मोजले होते. या पासवर त्याने २००८ पर्यंत १० हजारांपेक्षा अधिक वेळा विमान प्रवास केला. पण झालं असं की, यामुळे कंपनीला ४२ कोटी रूपयांचं नुकसान झालं. त्यानंतर कंपनीने त्या व्यक्तीची पास रद्द केली.
हे फार कुणाला माहीत नसेल पण विमानात पायलट आणि को-पायलट यांना वेगवेगळं जेवण दिलं जातं. असं करण्याचं कारण म्हणजे दोन्ही पायलट एकसारखं जेवण करून आजारी पडू नयेत. म्हणजे समजा पायलटला जे जेवण दिलं गेलं, त्यात काही गडबड असेल तर दोन्ही पायलट एकसारखं खाऊन आजारी पडू शकतात. अशात हे विमानातील प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकतं.