शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कमालच! फार पूर्वी चक्क सोनं वितळवून पित होते लोक, कारण वाचून चक्रावेल डोकं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:01 IST

Gold Drinking Facts : आयुष्य तरूण दिसण्याची किंवा आयुष्य वाढावं ही इच्छा काही आजची नाही. हजारो वर्षाआधीही लोकांना हेच वाटत होतं. यासाठी ते वेगवेगळे उपाय करत होते. त्यातीलच एक उपाय होता सोनं वितळवून पिणे.

Gold Drinking Facts : अनेकांना असं वाटत असतं की, आपण आयुष्यभर तरूणच रहावं किंवा आपलं आयुष्य वाढावं. अशात आयुष्य वाढवण्यासाठी बरेच लोक इतके काय काय कारनामे करतात की, त्यांवर विश्वासही बसत नाही. म्हातारपण रोखण्यासाठी वेगवेगळे व्यायाम किंवा औषधं घेतली जातात. याबाबत अनेक प्रयोगही मोठ्या लेव्हलवर सुरू आहेत. पण आयुष्यभर तरूण दिसण्याची किंवा आयुष्य वाढावं ही इच्छा काही आजची नाही. हजारो वर्षाआधीही लोकांना हेच वाटत होतं. यासाठी ते वेगवेगळे उपाय करत होते. त्यातीलच एक उपाय होता सोनं वितळवून पिणे.

१६ शतकातील फ्रान्सच्या राज दरबारात महत्वाच्या पदावर असलेल्या डायने डी पोयटिअर्स नावाच्या राजाच्या प्रेयसीने काही खास लोकांना आणि दरबारातील दुसऱ्या अधिकाऱ्यांना सोनं थोड्या थोड्या प्रमाणात वितळवून पिण्यास प्रेरित केलं. त्यावेळच्या लोकांना वाटत होतं की, सोनं वितळवून ते प्यायल्यास म्हातारपण रोखण्यास मदत मिळते. हा प्रकार फारच प्रचलित होता.

प्राचीन चीन आणि इजिप्तमध्ये प्रथा

म्हातारपण रोखण्यासाठी आणि आयुष्य वाढण्यासाठी सोनं पिण्याची प्रथा प्राचीन चीन आणि इजिप्तमध्ये होती. हिस्ट्री.कॉमनुसार, अमरत्व यावर पुस्तक लिहिणारे लेखक स्टीफन केव सांगतात की, रसायनशास्त्री पश्चिम आणि पूर्व दोन्ही ठिकाणी होते. ज्यांचं प्राथमिक लक्ष्य अमरत्वाचे उपायमध्ये बघायला मिळतात.

केव यांच्यानुसार, सोन्याला अविनाशी आणि सगळ्या धातुंमध्ये सगळ्यात शुद्ध मानलं जात होतं. त्यामुळे लोकांचं असं मत होतं की, अशा अविनाशी किंवा अमर पदार्थांचं थोड्या प्रमाणात सेवन केल्यानं लोक जास्त काळ जिवंत राहू शकतात.

इलिनोइस विश्वविद्यालयात महामारी विज्ञानाचे प्रोफेसर एस जे ओल्शांस्की सांगतात की, इ.स.पू. २५०० मध्ये चीनी रसायनशास्त्री वेई बोयांगने या सिद्धांताचा पुरस्कार केला होता की, अमर पदार्थांचं थोड्या प्रमाणात सेवन केल्यानं लोक जास्त काळ जगू शकतात.

त्यामुळे अनेक शासकांनी आपली संपत्ती वाढण्यासाठी भरपूर प्रमाणात सोनं खरेदी केलं आणि ते जमा केलं. त्यामुळे त्यावेळच्या संशोधकांकडे वितळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोनं उपलब्ध होतं.

राजाच्या प्रेयसीच्या केसांमध्ये सोनं

फ्रान्सचे राजा हेन्री द्वितीयची प्रेयसीचा मृत्यू ६६ वयात झाला होता. या वयापर्यंत तिने थोड्या थोड्या प्रमाणात भरपूर सोन्याचं सेवन केलं होतं. २००८ मध्ये जेव्हा तिचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या केसांमधील सोन्याचं प्रमाण सामान्यापेक्षा ५०० पटीने जास्त आढळलं होतं. इतकंच नाही तर तिच्या हाडांमध्ये पाऱ्याचा अंशही आढळला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Unbelievable! People Drank Molten Gold Long Ago: Shocking Reason

Web Summary : Ancient cultures, including the Chinese and Egyptians, believed drinking molten gold promoted longevity. Royals like King Henry II's mistress also consumed gold, hoping to halt aging, despite risks. High gold levels were found in her remains.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेGoldसोनं