शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Popcorn in Cinema Hall: थिएटरमध्ये पॉपकॉर्न इतके महाग का विकले जातात? जाणून घ्या त्यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 12:37 IST

Popcorn prices in Cinema Hall: थिएटरमधील पॉपकॉर्न आणि इतर खाद्यपदार्थ्यांच्या किमती हा आजचा वादाचा विषय नसून बराच आधीपासूनचा आहे. ...

Popcorn prices in Cinema Hall: थिएटरमधील पॉपकॉर्न आणि इतर खाद्यपदार्थ्यांच्या किमती हा आजचा वादाचा विषय नसून बराच आधीपासूनचा आहे. यावरून अनेक वेळा काही संघटनांनी आंदोलनं देखील केली आहेत. खाद्यपदार्थ्यांच्या किमती कमी असायला हव्यात. तसेच प्रेक्षकांना आपल्या घरचे डबे किंवा इतर खाद्यपदार्थ सिनेमा हॉलमध्ये घेऊन जाऊ द्यावेत यावरही अनेक वेळा चर्चा झाली. जानेवारी महिन्यात बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफने सिनेमागृहात असलेल्या पॉपकॉर्नच्या किमतीवर भाष्य केलं होतं. जग्गू दादा म्हणाले होते, 'थिएटरमध्ये पॉपकॉर्नची किंमत कमी करा. पॉपकॉर्नचे ५०० रुपये घेतात.' आज जागतिक रंगभूमी दिन (World Theatre Day 2023) च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगतो की सिनेमागृहांमध्ये पॉपकॉर्नची किंमत जास्त का असते?

सिनेमा हॉलमध्ये मिळणाऱ्या पॉपकॉर्नची किंमत कधीकधी चित्रपटाच्या तिकिटापेक्षा दुप्पट असते. अशा स्थितीत हा प्रश्न नेहमी मनात राहतो की ते इतके महाग का आणि त्यावर काही कायदेशीर बंधने आहेत की नाहीत? जानेवारी महिन्यातच सर्वोच्च न्यायालयाने सिनेमागृहांच्या मालकांना त्यांच्या इच्छेनुसार हॉलमध्ये अटी व शर्ती ठेवण्यास मोकळे असल्याचे सांगितले होते. यासोबतच चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना बाहेरून खाद्यपदार्थ आणण्यास बंदी घालण्यास हॉल मालक मोकळे आहेत, असेही न्यायालयाने म्हटले. म्हणजे थिएटर मालकांना त्यांच्या आवडीनुसार हॉलच्या आत खाण्या-पिण्याची किंमत ठरवता येतील असे सांगण्यात आले. आता बाहेर मिळणाऱ्या पॉपकॉर्नपेक्षा सिनेमा हॉलमधले भाव 10 पटीने कसे वाढतात? याची अनेक कारणे आहेत.

'फुलराणी' चित्रपटातील 'या' अभिनेत्रीचे Hot Photos पाहिलेत का?

ही असतात कारणं...

पहिले कारण, थिएटरमध्ये पॉपकॉर्न विक्रेत्यांना त्यांचा दुसरा कोणीही स्पर्धक नसतो. अशा स्थितीत एकदा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाच्या आवारात प्रवेश केला की, प्रेक्षकाला थिएटर स्टॉलशिवाय जेवणासाठी दुसरा पर्याय नसतो. अशा स्थितीत त्याला खायचेच असेल तर तो कितीही खर्च करून तिथलेच पॉपकॉर्न किंवा खाद्यपदार्थ खातो.

दुसरे कारण म्हणजे, अनेकवेळा चित्रपटगृह मालकांना चित्रपटाची तिकिटे तोट्यात विकावी लागतात. त्यांना बॉक्स ऑफिसमधून मिळणाऱ्या नफ्यातील मोठा हिस्सा वितरकांना द्यावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी उत्पन्न मिळवण्यासाठी अन्न व पेय पदार्थांची विक्री हे उत्पन्नाचे उत्तम साधन असते.

रेखाला आहेत ६ बहिणी! कुणी प्रसिद्ध डॉक्टर तर कुणी लोकप्रिय अँक्टर...

प्रेक्षकांना आहे 'हा' अधिकार!

चित्रपटगृहात पोहोचणाऱ्या लोकांना खाद्यपदार्थ विकत न घेण्याचा अधिकार असतो. हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे. अनेक वेळा थिएटर मालक तिकीटाची किंमत कमी करतात, जेणेकरून लोक मोठ्या संख्येने तिथे पोहोचतात आणि नंतर मग ते खाद्यपदार्थ्यांच्या व इतर वस्तूंद्वारे कमाई करू शकतील. पण तरीही आपण पॉपकॉर्न (किंवा खाद्यपदार्थ) विकत घ्यायचे की नाही, हे प्रेक्षक स्वत: ठरवू शकतात.

टॅग्स :cinemaसिनेमाTheatreनाटक