रेल्वे स्टेशनवरील पिवळ्या रंगाच्या बोर्डवर PH असं का लिहिलेलं असतं? जाणून घ्या याचा अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 10:21 AM2023-05-02T10:21:21+5:302023-05-02T10:22:33+5:30

Indian Railways Facts: भारतीय रेल्वेचं जाळं हे जगातल्या सगळ्यात मोठ्या रेल्वे सेवेपैकी एक आहे. भारतीय रेल्वेचं नेटवर्क हे जगात चौथ्या नंबरचं नेटवर्क आहे. लाखो लोक याने प्रवास करतात.

Why is PH written on the yellow board at the railway station | रेल्वे स्टेशनवरील पिवळ्या रंगाच्या बोर्डवर PH असं का लिहिलेलं असतं? जाणून घ्या याचा अर्थ

रेल्वे स्टेशनवरील पिवळ्या रंगाच्या बोर्डवर PH असं का लिहिलेलं असतं? जाणून घ्या याचा अर्थ

googlenewsNext

Indian Railways Facts:  लाखो लोक रोज रेल्वेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. रेल्वे स्टेशनवर वेगवेगळे बोर्ड लावलेले असतात. काही बोर्डवर स्टेशनच्या नावासमोर शेवटी 'P.H.' असं लिहिलेलं असतं. कधी विचार केलाय का की, याचा अर्थ काय होतो? पिवळ्या रंगाच्या बोर्डवर हे लिहिलेलं असतं. चला जाणून घेऊ याचा अर्थ.

भारतीय रेल्वेचं जाळं हे जगातल्या सगळ्यात मोठ्या रेल्वे सेवेपैकी एक आहे. भारतीय रेल्वेचं नेटवर्क हे जगात चौथ्या नंबरचं नेटवर्क आहे. लाखो लोक याने प्रवास करतात. पण अनेकांना रेल्वेसंबंधी कोड किंवा इतरही अनेक गोष्टी माहीत नसतात. रेल्वे आपल्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतं. 

तुम्हीही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल आणि रेल्वे स्टेशनवर पिवळ्या रंगाच्या बोर्डवर 'P.H.' असं लिहिलेलं पाहिलं असेल. पण याचा अर्थ तुम्हाला माहीत नसेल. तर या 'P.H.' चा अर्थ आहे 'पॅसेंजर हॉल्ट'. रेल्वेने प्रवास करताना आपल्याला पॅसेंजर हॉल्ट लागतात. हे स्टेशन मुळात क्लास 'डी' स्टेशन अंतर्गत येतात. या स्टेशनांवर लूप लाइन आणि सिग्नल नसतात त्यामुळे इथे कोणतेही कर्मचारी तैनात नसतात.

नावावरूनच समजून येतं की, या स्टेशनांवर केवळ प्रवासी रेल्वे थांबतात. एका पॅसेंजर रेल्वेचा लोको पायलट थांबतो आणि स्वत:च पुढे जातो. लोको पायलट इथे रेल्वे केवळ 2 मिनिटांसाठी थांबवतो.

Web Title: Why is PH written on the yellow board at the railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.