Indian Railway : आजकाल भरपूर लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेनं प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास आरामदायक, वेळ वाचवणारा आणि कमी खर्चीक असतो. रेल्वेनं प्रवास करण्याचा आनंदही वेगळाच असतो. अनेकदा तुम्हीही रेल्वेनं प्रवास केला असेल. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, रेल्वेत जनरल डबे केवळ मागे आणि पुढेच का असतात? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आज याचं उत्तर जाणून घ्या.
रेल्वेकडून याबाबतचं प्लानिंग विचार करूनच केलेलं असतं. रेल्वेमध्ये वेगवेगळ्या श्रेणीचे डबे लावले जातात, तेव्हाही प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षेची काळजी घेतली जाते.
जनरल डबे मागे आणि पुढेच का?
प्रत्येक रेल्वेचं स्ट्रक्चर जवळपास एकसारखं असतं. इंजिन सगळ्यात समोर आणि त्यानंतर जनरल डबा आणि मधे AC-3, AC-2 आणि स्लीपर कोच लावलेले असतात. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याची माहिती दिली की, सामान्यपणे रेल्वेच्या जनरल डब्यांमध्येच सगळ्यात जास्त प्रवासी असतात. अशात रेल्वेचे डबे दोन टोकांवर लावल्यानं लोकांची गर्दी स्टेशनवर विभागली जाते. असं केलं नाही तर स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर मधेच लोकांची जास्त गर्दी होईल. स्टेशनची पूर्ण व्यवस्था विस्कळीत होईल.
जनरल डबे मधे ठेवले तर सिटींग अरेंजमेंटसोबत इतर व्यवस्थाही व्यवस्थित होणार नाही. यामुळे प्रवाशी त्यांचं सामान घेऊन एकीकडून दुसरीकडे जाऊ शकणार नाहीत. याच कारणाने जनरल डबे प्रवाशांच्या सोयीसाठी दोन कोपऱ्यांवर लावले जातात.
इमरजन्सी
रेल्वे एक्सपर्ट्सचं यावर मत आहे की, जनरल डबे रेल्वेच्या दोन्ही टोकांवर असणं सेफ्टीच्या दृष्टीनेही चांगलं आहे. असं केल्याने जनरल डब्यांमध्ये होणारी गर्दी अंतरामुळे दोन भागांमध्ये विभागली जाते. याने कोणत्याही आपातकालीन स्थितीत लोकांना रेल्वेतून बाहेर निघणं सोपं होतं.