शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

कार, बस, ट्रकमधील जास्तीच्या टायरला स्टेपनी असं नाव का पडलं? क्वचितच कुणाला माहीत असेल उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 15:28 IST

Extra Tyre in Vehicles : गाडीतील या एक्स्ट्रा टायरला स्टेपनी का म्हणतात? कदाचित ९९ टक्के लोकांना हे माहीत नसेल. अशात तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

Extra Tyre In Vehicles : कुठेतरी बाहेर कारने फिरायला निघालात आणि रस्त्यात मधेच कारचा टायर पंचर झाल्याचा अनुभव आपल्याला कधीना कधी आला असेलच. मग काय गाडीच्या डिक्कीतील जॅक काढून भर रस्त्यात गाडीतील एक्स्ट्रा टायर म्हणजेच आपल्या ज्याला 'स्टेपनी' म्हणतो तो लावण्याचं काम करावं लागतं. इमरजन्सीमध्ये वापरता यावी म्हणून प्रत्येक चारचाकी वाहनात ही स्टेपनी असतेच. स्टेपनी लावण्याचं काम आपणही अनेकदा केलं असेल. पण आपल्याला हे माहीत आहे का की, गाडीतील या एक्स्ट्रा टायरला स्टेपनी का म्हणतात? कदाचित ९९ टक्के लोकांना हे माहीत नसेल. अशात तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

स्टेपनीची इंटरेस्टिंग कहाणी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आजपासून 100 पेक्षा जास्त वर्षाआधी गाड्यांचं इतकं चलन नव्हतं. लंडनच्या रस्त्यांवर जेव्हा गाड्या खराब होत होत्या, तेव्हा लोकांना खूप समस्या होत होती. मधेच गाड्या बंद पडणे, पंचर होणे फारच कॉमन होतं. ऐनवेळी त्यांना पंचर काढण्यासाठी मेकॅनिक आणि गॅरेज शोधावं लागत होतं. जर कुणी भेटलं नाही तर स्वत:च टायर बदलावे लागत होते. लोकांची होणारी हीच समस्या पाहून इंग्लंडमधील दोन भावांनी एक गॅरेज सुरू केलं.

स्टेपनीचा अर्थ काय?

असं सांगण्यात येतं की, दोन्ही भावांनी दुकानाचं नाव 'स्टेपनी टायर सर्व्हिस' असं ठेवलं. मुळात हे दुकानाचं नाव दोन्ही भावांनी त्यांच्या जिल्ह्याच्या नावावरून ठेवलं होतं. या दोन भावांचं नाव वॉल्टर आणि टॉम डेविस होतं. त्यांचा बिझनेस हळूहळू वाढला. हे दुकान स्टेपनी नावाने यूरोप आणि ब्रिटिश साम्राज्यात सगळीकडे फेमस झालं. अशाप्रकारे नंतर हळूहळू एक्स्ट्रा टायरचं नाव स्टेपनी पडलं. भारतातही हा ब्रॅन्ड खूप लोकप्रिय झाला. कोणत्याही कंपनीच्या स्पेअर टायरला 'स्टेपनी' असंच म्हटलं जाऊ लागलं.

आज 100 पेक्षा जास्त वर्षानंतरही गाडीच्या एक्स्ट्रा टायरला स्टेफनी असंच म्हणतात. तसं पाहिलं तर तो एक्स्ट्रा असतो जेणेकरून वेळेवर समस्या होऊ नये. आता तर अशा अनेक गाड्या आहेत ज्यात एक नाहीतर अनेक एक्स्ट्रा टायर असतात. यात मोठे ट्रक आणि मालवाहक गाड्यांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Why is the extra tire in vehicles called a 'Stepney'?

Web Summary : The term 'Stepney' for spare tires originated from 'Stepney Tyre Services,' a London garage founded by the Davis brothers over a century ago. Their brand became synonymous with spare tires across the British Empire, leading to the widespread use of the name.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके