शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
2
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
5
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
6
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
7
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
8
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
9
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
10
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
11
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
12
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
13
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
14
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
15
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
16
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
17
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
18
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
19
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
20
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
Daily Top 2Weekly Top 5

केवळ थंडीतच तोंडातून वाफ का निघते, उन्हाळा-पावसाळ्यात कुठे गायब होतो हा 'धूर'? पाहा यामागचं सायन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 10:13 IST

Interesting Facts : डिसेंबर आला की आपल्या पोटात काही पेटतं का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे जून-जुलैच्या उकाड्यात ही ‘जादू’ अचानक का गायब होते?

Interesting Facts : सध्या बऱ्याच भागांमध्ये कडाक्याची थंडी पडलेली आहे. लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, जॅकेट, ब्लॅंकेट या गोष्टींचा वापर करतात. थंडीमुळे या दिवसांमध्ये आपल्याला एक वेगळा आणि इंटरेस्टींग असा अनुभवही येतो. आपण पाहिलं असेल की, रजईतून बाहेर आल्यावर अचानक आपल्या तोंडातून पांढऱ्या धुरासारखा मोठा लोट बाहेर येतो. लहानपणी तर आपण सगळेच मित्रांसमोर शान मारण्यासाठी हे केलं असेल. ना काडी, ना सिगारेट, फक्त “फुं” करून धुराचे वर्तुळ काढायचा प्रयत्न! पण कधी विचार केलाय का, हा धूर नेमका येतो तरी कुठून? डिसेंबर आला की आपल्या पोटात काही पेटतं का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे जून-जुलैच्या उकाड्यात ही ‘जादू’ अचानक का गायब होते?

शरीर एक ‘चालतं-फिरतं हीटर’

सर्वात आधी हे समजून घ्यायला हवं की आपलं शरीर सुमारे 70% पाण्याने बनलेलं आहे. आपली फुफ्फुसं कायम ओलसर असतात. आपण श्वास सोडतो तेव्हा फक्त हवाच बाहेर जात नाही, तर शरीरातील उष्णता आणि थोडी ओलही बाहेर पडते. ही ओल वायुरूपात असते, म्हणून ती आपल्याला दिसत नाही.

थंड हवा आणि गरम श्वास यांचा सामना

हिवाळ्यात बाहेरचं वातावरण खूप थंड असतं, तर आपल्या शरीराचं तापमान साधारण 37 अंश सेल्सियस इतकं असतं. तोंडातून बाहेर पडलेली गरम हवा बाहेरच्या बर्फाळ हवेसोबत मिक्स होते, तशी ती लगेच थंड होते. थंडीमुळे हवेतली ती ‘अदृश्य ओल’ लगेच पाण्याच्या अगदी छोट्या-छोट्या थेंबांमध्ये बदलते. सायन्सच्या भाषेत या प्रक्रियेला ‘कंडेन्सेशन’ म्हणतात. हाच तो प्रकार आहे ज्यामुळे आकाशात ढग तयार होतात. म्हणजेच, हिवाळ्यात तोंडातून बाहेर येणारा तो धूर नसून, एक छोटासा ढगच असतो.

मग उन्हाळ्यात हा धूर का दिसत नाही?

आता प्रश्न पडतो की हा ‘पांढरा धूर’ उन्हाळ्यात कुठे जातो? खरंतर, उन्हाळ्यात बाहेरचं तापमानही शरीराच्या तापमानाच्या आसपासच असतं. तुम्ही श्वास सोडता तेव्हा शरीरातून निघालेल्या गरम हवेला बाहेर गरम हवा भेटते. तापमानात फारसा फरक नसल्यामुळे त्या ओलसर हवेला थंड होऊन पाण्याच्या थेंबांमध्ये बदलण्याची संधीच मिळत नाही. ती वायुरूपातच हवेत मिसळते आणि म्हणून आपल्याला काहीच दिसत नाही. तर अशी ही तोंडातून निघणाऱ्या धुराची गंमत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Winter's breath: The science behind why you see your breath.

Web Summary : The 'smoke' from our breath in winter is due to condensation. Warm, moist air meets cold air, turning into tiny water droplets. In summer, similar temperatures prevent this, so no visible vapor forms.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके