शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

भारतामध्ये मोबाईल नंबर १० अंकीच का असतो? जाणून घ्या यामागचं गणित आणि कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 17:09 IST

Interesting Facts : भारतात मोबाईल नंबर 10 अंकांचेच का असतात? आपल्यालाही माहीत नसेल कारण...

Interesting Facts : आपण दररोज मोबाईल नंबर डायल करतो, पण कधी विचार केला आहे का की भारतात मोबाईल नंबर १० अंकांचेच का असतात? जर या नंबरमध्ये एखादा अंक कमी-जास्त झाला, तर तो नंबर लागत नाही. मग प्रश्न येतो की, जर मोबाईल नंबर ८, ९ किंवा ११ अंकी असते, तर नेमकं काय बिघडलं असतं? चला जाणून घेऊया या मागचं गणित आणि कारण.

१० अंकी मोबाईल नंबरचे गणित

प्रत्येक देश आपली लोकसंख्या आणि नेटवर्कची गरज पाहून फोन नंबरची रचना ठरवतो. १० अंकी नंबर सिस्टिममध्ये एकूण १० अब्ज (१०,०००,०००,०००) वेगवेगळे नंबर तयार होऊ शकतात. ही संख्या भारतासारख्या भक्कम लोकसंख्या असलेल्या देशासाठी पुरेशी आहे. जर नंबर ९ अंकी असता, तर फक्त १०० कोटी नंबर तयार झाले असते. जे भारतासाठी अपुरे आहेत. तर ११ अंकी नंबरमध्ये १०० अब्ज शक्यता असतात, जे खूपच जास्त आहेत आणि डायल करतानाही वेळखाऊ ठरले असते. म्हणूनच, १० अंकांचा नंबर हा संतुलित आणि व्यवहार्य पर्याय ठरला.

या १० अंकांचा अर्थ काय असतो?

मोबाईल नंबर केवळ तुमची ओळख नसून तो एक नेटवर्क अ‍ॅड्रेस सुद्धा असतो. तो टेलिकॉम नेटवर्कला सांगतो की कॉल कुठल्या क्षेत्रात आणि कुठल्या कंपनीकडे रूट करायचा आहे. पहिले ४ किंवा ५ अंक हे टेलिकॉम ऑपरेटर आणि सर्कल ओळखण्यासाठी असतात. उरलेले बाकिचे ५ किंवा ६ अंक हे ग्राहकाचा वेगळा, यूनिक नंबर असतो.

भारतात सुरुवातीपासून १० अंकी नंबर होते का?

नाही! १९९० च्या दशकात फोन नंबर ६ किंवा ७ अंकी असायचे. २००० नंतर मोबाईल क्रांतीमुळे ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे जुन्या नंबर सिस्टिममध्ये नवीन ग्राहकांना नंबर देणं अवघड झालं. म्हणूनच TRAI ने २००३ च्या सुमारास १० अंकी मोबाईल नंबर सिस्टिम देशभर लागू केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Why are Indian mobile numbers 10 digits? The reason explained.

Web Summary : India uses 10-digit mobile numbers to accommodate its large population. Shorter numbers are insufficient; longer numbers are impractical. The digits identify operator and subscriber, a system implemented by TRAI in 2003 due to mobile growth.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके