शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

श्वान आपलं डोकं एका बाजूला का झुकवतात? वैज्ञानिकांनी केला याचा खुलासा, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 09:36 IST

Dog Facts : मनुष्य श्वानांसोबत बोलत असताना श्वान त्यांनी मान एका दिशेला झुकवतात. वैज्ञानिकांनी यामागचं रहस्य उलगडलं आहे. 

Dog Facts : तुम्ही जर श्वान प्रेमी असाल तर कधीना कधी तुमच्या लक्षात आलं असेल की, जेव्हा तुम्ही एखाद्या श्वानासोबत शांतपणे किंवा प्रेमाने बोलत असता तेव्हा ते डोकं एका बाजूला तिरपं करतात. तुम्हीही अनेकदा श्वानाचा हे वागणं पाहिलं असेलच. पण क्वचितच कुणाला माहीत असेल की, मनुष्याचा सगळ्यात चांगला मित्र असलेला हा प्राणी असं का करतो. मनुष्य श्वानांसोबत बोलत असताना श्वान त्यांनी मान एका दिशेला झुकवतात. वैज्ञानिकांनी यामागचं रहस्य उलगडलं आहे. 

वैज्ञानिकांनुसार, श्वानांचा स्वभाव देखील असाच असतो. इओत्वोस लोरैंड यूनिवर्सिटी (Eotvos Lorand University) च्या वैज्ञानिकांनी सांगितलं की, जगातले बरेच प्राणी जगातील दृश्य, ध्वनी आणि गंध फील करतेवेळी आपलं डोकं एका बाजूला झुकवतात. 

श्वानांच्या हावभावाचा अभ्यास

शोधाचे प्रमुख लेखक एंड्रिया सोम्मेस म्हणाले की, आम्ही श्वानांच्या मालकांना सांगितलं की, त्यांना वेगवेगळ्या खेळण्यांची नावे सांगा. यादरम्यान श्वानांच्या हावभावाचा अभ्यास करण्यात आला. आम्हाला आढळून आलं की, त्यांच्या डोक्याची मुव्हमेंट आणि मालकाच्या आवाजात एक खास कनेक्शन आहे. आवाजाच्या टोननुसार, श्वास आपली मान एका बाजूला झुकवतात. जेव्हा मालक त्यांना समजावण्याच्या टोनमध्ये काही बोलतात तेव्हा श्वान डोकं एका बाजूला झुकवून त्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकतात.

मनुष्य आणि पक्षीही असंच करतात

रिपन कॉलेजच्या साइंटिस्‍ट जूलिया मॅनर म्हणाल्या की, मनुष्य आणि पक्षीही असेच करतात. बऱ्याच वेगवेगळ्या प्रजाती आहेत जे अशाप्रकारे डोकं एका बाजूला झुकवतात. कारण ते कानांचा अॅंगल बदलतात. जेणेकरून त्यांना व्यवस्थित ऐकू यावं. घुबड याबाबतील चॅम्पियन असतात. ते त्यांची मान 270 डिग्रीपर्यंत फिरवू शकतात. अशाने त्यांना शिकार लवकर दिसते.

वैज्ञानिकांचं मत आहे की, श्वान वेगवेगळ्या ब्रीडचे असतात. यातील काही जास्त समजदार असतात. ते त्यांच्या मालकांचं बोलणं लगेच समजतात. शोधादरम्यान चांगल्या ब्रीडच्या 40 श्वानांनी शोधाच्या 43 टक्के वेळा आपलं डोकं एका बाजूला झुकवलं होतं. सोम्‍मेजनुसार, काही प्रतिभावान श्वानांनी डोकं त्याच दिशेला झुकवलं ज्या दिशेला मालक उभे होते.

टॅग्स :dogकुत्राInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके