Tickle Interesting Facts : गुदगुल्या ही अशी जाणीव आहे ज्याबाबत बरेच लोक खूप जास्त सेन्सिटीव्ह असतात. गंमत करण्यासाठी लोक एकमेकांना गुदगुल्या करतात. लहान मुलांसोबत मोठ्यांनाही कधी कधी गुदगुल्या करणं आवडतं. मित्रांनी किंवा घरातील एखाद्या व्यक्तीनं किंवा कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीनं गुदगुल्या केल्या तर कुणीही खळखळून हसेल. काही लोकांना तर इतक्या गुदगुल्या होतात की, ते हसत हसत जमिनीवर लोळू लागतात. पण तुम्ही जर स्वत:च स्वत:ला गुदगुल्या केल्या तर तुम्हाला अजिबात हसू येत नाही. याचं कारण काय? असा तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर त्याचं कारण जाणून घेऊया.
मेंदुची भूमिका महत्वाची
आपला मेंदू इतका हुशार असतो की, त्याला आपल्या सगळ्या हालचाली, भावना माहीत असतात. तुम्ही जर स्वत:ला गुदगुल्या करण्याचा विचार केला तर मेंदुला आधीच हे माहीत असतं की, तुम्ही काय करणार आहात. त्यामुळे असं काही करताना वेगळं काही जाणवत नाही.
तेच जर दुसऱ्यांनी कुणी गुदगुल्या केल्या तर तुमच्या मेंदुला हे माहीत नसतं की, तुम्हाला कुणी गुदगुल्या करणार आहे. ही एक अचानक घडणारी बाब असते. ज्यामुळे शरीर लगेच रिअॅक्शन देतं आणि तुम्ही लोटपोट होऊ हसता किंवा तुम्ही लगेच जागेवर उडी घेता.
मेंदुला कोणं कंट्रोल करतं
आपल्या मेंदुमध्ये एक खास भाग असतो ज्याला सेरिबेलम म्हटलं जातं. हा भाग शरीराच्या हालचाली कंट्रोल करतो. जेव्हा आपण स्वत:ला गुदगुल्या करतो तेव्हा सेरिबेलमला माहीत असतं की, हा तुमचाच स्पर्श आहे. पण तेच जर दुसरं कुणी गुदगुल्या केल्या तर ही अचानक घडलेली बाब असते. ज्यामुळे शरीर लगेच रिअॅक्शन देतं.
गुदगुल्यांचं वेगळं महत्व
सामान्यपणे जास्तीत जास्त लोक गंमत करण्यासाठी दुसऱ्यांना गुदगुल्या करतात. पण मुळात ही बाब केवळ गंमतीसाठी नाहीय. गुदगुल्या ही जाणीव आपल्या शरीराच्या सिक्युरिटी सिस्टीमचा भाग आहे. आपले पूर्वज आधी जेव्हा जंगलांमध्ये राहत होते, तेव्हा शरीराच्या सेन्सिटीव्ह भागांना वाचवण्यासाठी ही नॅचरल रिअॅक्शन विकसित झाली. जेव्हा कुणी आपल्याला गुदगुल्या करतं तेव्हा मान, पोट आणि काख हे भाग मेंदुला संकेत पाठवतात की, हे भाग सुरक्षित नाहीत. तेव्हा आपला मेंदू आपल्या तिथून बाजूला होण्यासाठी आणि हलण्यासाठी भाग पाडतो.