शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वेस्टर्न टॉयलेटच्या फ्लशमध्ये दोन बटन का दिलेले असतात? ९९ टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 16:22 IST

Western Toilet Button : तुम्ही कधी लक्ष दिलंय का की, फ्लश टॅंकवर दोन प्रकारचे बटन असतात. एक छोटं असतं आणि दुसरं मोठं असतं. पण हे दोन बटन देण्याचं कारण काय असतं?

Western Toilet Button : आजकाल जास्तीत जास्त घरांमध्ये वेस्टर्न टॉयलेट बघायला मिळतात. खासकरून शहरी भागात याचं प्रमाण अधिक बघायला मिळतं. टॉयलेट सीटच्या मागे पाण्यासाठी एक फ्लश टॅंकही दिलेली असते. त्यावरील बटन दाबून टॉयलेटनंतर पाणी सोडलं जातं. तुम्हीही कधीना कधी फ्लशचा वापर केला असेलच. पण तुम्ही कधी लक्ष दिलंय का की, फ्लश टॅंकवर दोन प्रकारचे बटन असतात. एक छोटं असतं आणि दुसरं मोठं असतं. पण हे दोन बटन देण्याचं कारण काय असतं? हे तुम्हाला माहीत नसेल. चला तर मग तेच आज जाणून घेऊ.

अमेरिकेतील डिझायनर व्हिक्टर पापानेकनं टॉयलेटमध्ये ड्यूअल फ्लश म्हणजेच दोन बटन असलेलं फ्लश देण्याची आयडिया दिली होती. सुरूवातीला यावर छोट्या प्रमाणात टेस्ट केली गेली होती. ही टेस्ट यशस्वी झाल्यावर याचा वापर जगभरात होऊ लागला. 

'हे' आहे मुख्य कारण!

जगभरात सध्या पाण्याची समस्या समस्या भीषण झाली आहे. पाणी वाचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय केले जात आहेत. वेस्टर्न टॉयलेटमध्ये ड्यूअल फ्लश म्हणजेच दोन बटन असणाऱ्या फ्लशचा वापर पाणी वाचवण्यासाठी केला जातो.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, वेस्टर्न टॉयलेटच्या फ्लशमध्ये मोठं बटन सॉलिड वेस्ट रिमुव्हलसाठी असतं, जे दाबल्यावर ६ लिटर ते ९ लिटर पाणी वाहतं. तर छोटं बटन दाबल्यावर वाहणाऱ्या पाण्याचं प्रमाण हे तीन ते चार लिटर असतं.

वेगवेगळा आहे दोन्हींचा वापर

हे माहीत झाल्यावर आता तुम्ही वेस्टर्न टॉयलेटचा योग्य वापर कराल. म्हणजे तुम्ही केवळ लघवीला गेले असाल तर छोटं बटन दाबून पाणी सोडू शकता, तर शौचास गेले असाल तर मोठं बटन दाबून पाणी सोडू शकता. अनेकदा लोक एकत्रच दोन्ही बटन दाबतात. जेणेकरून जास्त पाणी निघावं. पण असं नसतं. दोन्ही बटन एकत्र दाबले तर ते खराब होऊ शकतात. त्यामुळे गरजेनुसार त्यांचा वापर करावा.

या बटनांचा योग्य वापर न केल्यास कितीतरी लिटर पाणी वाया जातं. रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे की, सिंगल बटनाऐवजी दोन बटन असलेल्या फ्लश सिस्टीमनं घरांमध्ये वर्षभरात २० हजार लिटर पाणी वाचवलं जाऊ शकतं. सध्या आपल्याला पाणी वाचवण्याची आणि ते पुढील पीढीला देण्याची गरज आहे. पण आपण नकळत हजारो लिटर पाणी वाया घालवत आहोत. वेस्टर्न कमोडमध्ये २ बटनांची सिस्टीम १९७६ मध्ये सुरू करण्यात आली आणि याचा वापर सगळ्यात आधी १९८० मध्ये ऑस्ट्रेलियात करण्यात आला.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके