Airplane Interesting Facts : प्रवाशी बस चालवणं असो, रेल्वे चालवणं असो, लोकल चालवणं असो किंवा विमान चालवणं असो हे एक मोठं जबाबदारीचं काम असतं. यात जराही काही बेजबाबदार वागणूक केली गेली तर अनेकांचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे या चालकांसाठी काही नियम ठरवलेले असतात. या नियमांचं पालन करावंच लागतं. अशाच एक नियम म्हणजे विमानाचे पायलट परफ्यूम किंवा हॅंड सॅनिटायजरचा वापर करत नाहीत.
कुणालाही असा प्रश्न पडू शकतो की, परफ्यूम आणि हॅंड सॅनिटायजर तर रोजच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत, त्यात काय? मुळात हा नियम विमानासोबतच विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आहे. चला तर पाहुयात नेमकं कारण काय आहे.
काय आहे कारण?
प्रत्येक उड्डाणाआधी पायलटला ब्रेथअॅनालायजर टेस्ट करावी लागते. ही टेस्ट विमानाच्या सुरक्षेसाठी खूप महत्वाची असते. या टेस्टमध्ये पायलटला एका मशीनमध्ये फुंकायचं अससतं, ज्याद्वारे हे समजून येतं की, पायलटने दारू प्यायली आहे की नाही. अशात परम्यून किंवा हॅंड सॅनिटायजरचा वापर केल्यानं रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याचा धोका असतो.
मुळात परफ्यूम, माउथ वॉश आणि हॅंड सॅनिटायजरमध्ये इथाइल अल्कोहोलचा वापर केला जातो. जर टेस्ट दरम्यान मशीनन ते डिटेक्ट केलं तर रिझल्ट पॉझिटिव्ह येऊ शकतो. ज्यामुळे पायलटवर नियम तोडल्याची कारवाई होऊ शकते किंवा फ्लाइटला उशीर होऊ शकतो. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर पायलटला थोडी वाट बघावी लागते आणि त्यानंतर थोड्या वेळानं पुन्हा ब्रेथ अॅनालायजर टेस्ट केली जाते.
इतरही आहेत कारणं
वरील कारणाशिवाय काही परफ्यूमचा गंध डार्क असतो, ज्यामुळे दुसऱऱ्यांना त्रास होऊ शकतो. खासकरून पायलट कॉकपिटमध्ये. जर पायलट किंवा को-पायलटला परफ्यूमच्या डार्क गंधानं त्रास होत असेल तर त्यांचं लक्ष विचलित होऊ शकतं. ज्यामुळे दुर्घटना होण्याचा धोका असतो.
जास्तीत जास्त एअरलाईन्स आणि अॅव्हिएशन व्यवस्थापनाकडून सुरक्षेचं काटेकोर पालन केलं जातं. या नियमांद्वारे पायलट्सना असे प्रॉडक्ट्स न वापरण्याचा सल्ला दिला जातो. एकंदर काय तर परफ्यूम आणि हॅंड सॅनिटायजरसारख्या गोष्टींचा वापर न करण्यामागे विमान, प्रवासी यांच्या सुरक्षेचं कारण असतं.