या महिलेची सफाई करण्याची स्टाइल पाहून सगळे झाले अवाक, सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 16:55 IST2017-10-05T16:51:35+5:302017-10-05T16:55:21+5:30
घरात साफसफाई करण्याची वेळ तुमच्या पैकी सगळ्यांवरच आली असेल. कधी घरी कुणी नसल्याने, तर कधी घरच्यानी बजावल्याने नाइलाज म्हणून साफसफाईसाठी तुम्ही हातात झाडू घेतली असेल. मग साफसफाई करताना वेगवेगळ्या स्टाइलने झाडू मारण्याची गंमतही तुम्ही केली असेल. पण...

या महिलेची सफाई करण्याची स्टाइल पाहून सगळे झाले अवाक, सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
नवी दिल्ली - घरात साफसफाई करण्याची वेळ तुमच्या पैकी सगळ्यांवरच आली असेल. कधी घरी कुणी नसल्याने, तर कधी घरच्यानी बजावल्याने नाइलाज म्हणून साफसफाईसाठी तुम्ही हातात झाडू घेतली असेल. मग साफसफाई करताना वेगवेगळ्या स्टाइलने झाडू मारण्याची गंमतही तुम्ही केली असेल. पण सध्या सोशल मीडियावर साफसफाई करतानाचा एका महिलेचा हटके व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.
ही महिला हॉवर बोर्डवर बसून अंगणात झाडू मारत आहे. मात्र या महिलेने आपला तोल सावरत ज्यापद्धतीने सफाई केली आहे ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसत आहे. तंत्रज्ञानाचा कशापद्धतीने गमतीशीर वापर होऊ शकतो, हे या व्हिडिओमधून दाखवण्यात आले आहे. तसेच पर्फेक्ट युज ऑफ टेक्नॉलॉजी अशी कॅप्शन देत नेटिझन्स हा व्हिडिओ शेअर करत आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ पाकिस्तानमधील कुठल्यातरी गावातील असल्याची माहिती आहे.
पाहा व्हिडिओ
Probably one of the best uses of #HoverBoard.... #Pakistanpic.twitter.com/67YZ5ZJ23e