देशाच्या कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे मिळणारं देशातील एकमेव स्टेशन, नाव वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 16:37 IST2025-12-22T16:35:59+5:302025-12-22T16:37:42+5:30
Railway Interesting Facts: भारतातील एका खास रेल्वे स्टेशनची नेहमीच चर्चा होत असते. असा दावा केला जातो की, हे देशातील एकुलतं एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथून देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी रेल्वे मिळते.

देशाच्या कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे मिळणारं देशातील एकमेव स्टेशन, नाव वाचून व्हाल अवाक्
Railway Interesting Facts: भारतातील रेल्वेचं जाळं हे जगातील सगळ्यात मोठ्या नेटवर्कपैकी एक आहे. अजूनही हे रेल्वेचं नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चांललं आहे. नवनवीन सुविधा दिल्या जात आहे. जेणेकरून प्रवाशांचा प्रवास आरामदायक आणि लवकर व्हावा. भारतातील रेल्वेचीच नाही तर रेल्वे स्टेशनची देखील बातच वेगळी आहे. देशातील प्रत्येक रेल्वे स्टेशनचं आपलं एक महत्व आणि रहस्य आहे. जेव्हा या गोष्टी समोर येतात तेव्हा लोकही अचंबित होतात. भारतातील एका खास रेल्वे स्टेशनची नेहमीच चर्चा होत असते. असा दावा केला जातो की, हे देशातील एकुलतं एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथून देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी रेल्वे मिळते.
कोणत्या स्टेशनहून मिळते कुठेही जाण्यासाठी रेल्वे
देशातील कानाकोपऱ्यात जाण्यासाठी जिथून रेल्वे मिळते, ते रेल्वे स्टेशन म्हणजे मथुरा जंक्शन. इथून आपल्याला देशातील कोणत्याही कोपऱ्यात जाण्यासाठी रेल्वे मिळते. कारण हे स्टेशन दिल्ली-मुंबई आणि दिल्ली कोलकाता यांसारख्या मुख्य मार्गावर आहे. इथे प्रत्येक दिशेला जाणाऱ्या रेल्वे थांबतात. त्यामुळे लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कनेक्टिविटी मिळते.
हे एक मोठं जंक्शन स्टेशन आहे जिथून दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, केरळ, तामिळनाडू, राजस्थान, बिहार आणि इतर राज्यांसाठी रेल्वे मिळतात. हे दिल्ली-मुंबई आणि दिल्ली कोलकातासारख्या मुख्य मार्गांवर स्थित आहे. ज्यामुळे इथून रेल्वेच्या भरपूर फेऱ्या होतात. राजधानी, शताब्दी, दुरांतो सारख्या प्रीमिअम रेल्वेसोबतच सुपरफास्ट आणि एक्सप्रेस रेल्वेही इथे थांबतात.
काही अनोखे रेल्वे स्टेशन
भारतात आपल्याला अशा अनेक रेल्वे स्टेशनबाबत ऐकायला मिळेल. उदाहरणार्थ नवापूर रेल्वे स्टेशन. जे महाराष्ट्र आणि गुजरात दोन्हींच्या मधे आहे. तेच भारतात अटारीसारखं रेल्वे स्टेशनही आहे जिथे व्हिसाची गरज पडते. भारतात २८ अक्षरांचं नाव असलेलं 'वेंकटनरसिम्हाराजुवारिपेटा' स्टेशनही आहे. इथे आपल्याला लखनौ सिटी स्टेशनही दिसतं, जे पूर्णपणे महिलांकडून चालवलं जातं.
सगळ्यात जास्त प्लॅटफॉर्म असलेलं रेल्वे स्टेशन
भारतात एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथे सगळ्यात जास्त प्लॅटफॉर्म आहेत. हे नंबर वन रेल्वे स्टेशन म्हणजे हावडा जंक्शन आहे. इथे सगळ्यात जास्त म्हणजे तब्बल २३ प्लॅटफॉर्म आहेत. हे सगळ्यात जास्त वर्दळीचं स्टेशन मानलं जातं. त्यामुळे मोठ्या आवाक्याबाबत आणि गर्दीबाबत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा आणि दिल्लीच्या रेल्वे स्टेशनचा नंबर लागतो.