शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीवरून मानव कधी आणि कसा नामशेष होणार? शास्त्रज्ञांनी दिली मोठी माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 15:12 IST

शास्त्रज्ञांनी मानवाच्या नामशेष होण्याची भविष्यवाणी केली आहे.

आतापर्यंत पृथ्वीवरुन हजारो-लाखो प्राणी नामशेष झाले आहेत. दरम्यान, आता मानवाच्या नामशेषाचा मुद्दाही शास्त्रज्ञांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. शास्त्रज्ञांनी मानव नष्ट होण्याची शक्यता वर्तवली आहे. आपल्या भविष्यवाणीत त्यांनी याचे कारण आणि वर्षाची माहितीदेखील दिली आहे. इंग्लंडच्या ब्रिस्टर युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात हा दावा केला आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे की, पुढील 250 मिलियन वर्षांत मानव आणि इतर सर्व सस्तन प्राणी नामशेष होतील. हवामान बदलाचा परिणाम समजून घेऊन वैज्ञानिकांनी त्यावर आधारित एक मॉडेल तयार केले आहे, ज्याच्या मदतीने मानव आणि इतर सस्तन प्राणी पृथ्वीवर किती काळ टिकतील, हे सांगण्यात आले आहे.

नामशेष होण्याचे कारणसंशोधक अलेक्झांडर फर्न्सवर्थ यांच्या मते, पृथ्वीवरील मानव आणि इतर सस्तन प्राण्यांना 40 ते 70 अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागेल. जर आपण भविष्याकडे पाहिले तर ते अंधकारमय असेल, कारण कार्बन डायऑक्साइडची पातळी सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पट होऊ शकते. मानव आणि इतर प्रजाती उष्णतेशी लढण्यास आणि शरीराला थंड ठेवण्यास असमर्थ होतील.

परिस्थिती का आणि कशी बिघडणार?संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, पृथ्वी एक महाखंड बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पुढील 250 वर्षांत केवळ 8 ते 16 टक्के क्षेत्रच राहण्यासयोग्य असेल. ते Pangea Ultima म्हणून ओळखले जाईल. येथील तापमान झपाट्याने वाढेल. आर्द्रतेचा परिणाम दिसून येईल. जगभरातील तापमान किमान 15 अंशांनी वाढेल. भविष्यात पृथ्वी राहण्यास योग्य असणार नाही. 

अहवालात म्हटले आहे की, केवळ त्याच प्रजाती टिकून राहतील, ज्या तापमानाच्या प्रभावापासून स्वतःला दूर ठेवण्यास सक्षम असतील. हवामान बदलावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, सरकारांनी हवामान बदलाच्या सर्वात वाईट परिस्थितीशी संबंधित परिणामांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तापमान अपेक्षेपेक्षा जास्त वाढले, तर पृथ्वीवरील सर्व मानवी जीवन संपण्याची शक्यताही वाढेल. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सDeathमृत्यूEarthपृथ्वी