Airplane Interesting Facts : आजकाल बरेच लोक कामानिमित्ताने म्हणा, फिरायला जाण्यासाठी म्हणा किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या देशात जाण्यासाठी विमानाने प्रवास करतात. आधीच्या तुलनेत अलिकडे विमानानं प्रवास करणं फारच कॉमन आणि सोपं झालं आहे. विमानतळांची आणि विमानांची संख्या वाढली आहे. पण तरी आजही असे अनेक लोक आहेत, जे एकदा तरी विमानातून प्रवास करण्याचं स्वप्न उराशी बाळगून असतात. विमानांच्या बऱ्याच गोष्टी जाणून घेण्याची त्यांना मोठी उत्सुकता लागलेली असते. सोशल मीडियावर सुद्धा विमानाबाबतच्या अनेक इंटरेस्टींग गोष्टी काही लोक शेअर करत असतात. अशात आज आम्ही सुद्धा आपल्याला विमानाबाबतची एक वेगळी बाब सांगणार आहोत. ती म्हणजे विमानातील टॉयलेटला टॉयलेट नाही तर वेगळं काहीतरी म्हटलं जातं.
विमानातील टॉयलेटला काय म्हणतात?
आपण जर विचार करत असाल की, विमानातील टॉयलेटला टॉयलेट, बाथरूम किंवा रेस्टरूम म्हणतात, तर आपण चुकताय. सामान्यपणे कुणालाही असंच वाटू शकतं की, रेल्वेप्रमाणे टॉयलेटला टॉयलेट किंवा रेस्टरूम म्हटलं जाऊ शकतं. पण असं अजिबात नाहीये. सत्य हे आहे की, विमानातील टॉयलेटला टॉयलेट, रेस्टरूम नाही तर 'लॅव्हेटरी(Lavatory)' असं म्हणतात. विमानाने प्रवास केलेल्या अनेकांना हे माहीत असेल किंवा काहींना विमानात प्रवास करूनही याची कल्पना नसेल.
लॅव्हेटरी कसं काम करतं?
विमानातील टॉयलेट ज्याला लॅव्हेटरी म्हणतात, ते पाण्यावर नाही तर व्हॅक्यूम टॉयलेट सिस्टीमवर काम करतं. यात फ्लश केल्यानंतर एक व्हॉल्व ओपन होतो आणि बाहेरच्या कमी दबावामुळे हवेचं सक्शन कचरा खेचतं आणि तो कचरा खालच्या टॅंकमध्ये पोहोचतो. आपल्याला प्रश्न पडला असेल की, फ्लश करताना पाणी येत नाही तर मग आवाज कशाचा येतो? तर हा आवाज व्हॅक्यूम सिस्टीममुळे येतो.
विमानात स्मोकिंगवर बंदी, मग टॉयलेटमध्ये अॅशस्ट्रे का असतो?
सगळ्याच एअरलाईन्सच्या विमानांमध्ये स्मोकिंग करण्यावर पूर्णपणे बंदी आहे. १९८० दरम्यान बऱ्याच एअरलाइन्सनी स्मोकिंगवर बंदी घातली होती. २००० सालापर्यंत हा नियम सगळीकडे लागू करण्यात आला. जर हा नियम कुणी मोडला तर त्यांना दंड भरावा लागतो आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाते.
मग अॅशट्रेचं काय काम?
असं वाटू शकतं की, विमानाच्या टॉयलेटमध्ये अॅशस्ट्रे लोकांना चोरून स्मोकिंग करण्यासाठी लावला जात असेल. पण असं अजिबात नाहीये. हा अॅशस्ट्रे विमानातील टॉयलेटमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने लावला जातो. आंतरराष्ट्रीय विमान नियमांनुसार प्रत्येक कमर्शिअल फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये एक अॅशस्ट्रे असणं बंधनकारक आहे. भलेही स्मोकिंगची परवानगी नसो.
सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाचा
नियम तयार करणारे असं मानून चालतात की, कितीही कठोर नियम का असेना, पण एखादा प्रवासी असा असतो जो लपून स्मोकिंग करण्याचा प्रयत्न करू शकतो. जर कुणी असं केलं आणि त्याला सिगारेट विझवण्यासाठी जागा मिळाली नाही तर ती व्यक्ती सिगारेट कुठेही फेकू शकते. जसे की, कचऱ्याचा डबा.
कचऱ्याच्या डब्यामध्ये भरपूर टिशू पेपर आणि इतरही आग पकडणाऱ्या गोष्टी असतात. अशात जर कुणी पेटलेली सिगारेट त्यात टाकली तर आग लागण्याचा धोका अधिक वाढतो. अर्थातच विमानात आग लागणं सगळ्यात भयानक आपात स्थितींपैकी एक आहे.
हाच तो धोका आहे ज्यापासून बचाव करण्यासाठी विमानाच्या वॉशरूममध्ये अॅशस्ट्रे दिलेला असतो. याचा उद्देश हा असतो की, जर एखाद्या प्रवाशानं नियम तोडून सिगारेट ओढली तर त्याच्याकडे ती विझवण्यासाठी जागा असावी. जेणेकरून आग लागण्याचा धोका टाळता यावा.
Web Summary : Airplane toilets are called 'lavatories' and use vacuum systems. Smoking is banned, but ashtrays exist for safety, preventing fires from improperly discarded cigarettes, ensuring passenger safety despite the smoking ban.
Web Summary : विमान शौचालयों को 'लॅवेटरी' कहा जाता है और वैक्यूम सिस्टम का उपयोग किया जाता है। धूम्रपान निषेध है, लेकिन एशट्रे सुरक्षा के लिए हैं, गलत तरीके से फेंकी गई सिगरेट से आग को रोकते हैं, धूम्रपान निषेध के बावजूद यात्री सुरक्षा सुनिश्चित करते हैं।