काय आहे डंकी रूट, जीवाची पर्वा न करता का तरूणांना जायचंय परदेशात?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 03:06 PM2023-11-22T15:06:50+5:302023-11-22T15:07:21+5:30

What is Donkey Route: सामान्य शब्दांमध्ये सांगायचं तर जेव्हा लोकांना वेगवेगळ्या देशांमध्ये थांबे घेत घेत बेकायदेशीर पद्धतीने दुसऱ्या देशात पाठवलं जातं तेव्हा त्याला डंकी रूट म्हटलं जातं.

What is the meaning of donkey route, know why its popular in Punjab and Haryana | काय आहे डंकी रूट, जीवाची पर्वा न करता का तरूणांना जायचंय परदेशात?

काय आहे डंकी रूट, जीवाची पर्वा न करता का तरूणांना जायचंय परदेशात?

What is Donkey Route:  परदेशात जाण्याची इच्छा सगळ्यांचीच असते. खासकरून अमेरिका, कॅनडा, इंग्लंडची झगमगाट भारतीयांना फार आकर्षित करते. चांगली नोकरी, चांगली लाइफस्टाईल आणि जास्त कमाई या देशांमध्ये जाण्याचं मोठं कारण आहे. पण देशांचे नियम फारच कठोर असतात आणि यामुळे कमी प्रमाणात भारतीयच इथे कायदेशीर मार्गाने जाऊ शकतात. देशातील अनेक तरूण अमेरिकेत जाऊन भरपूर पैसे कमावण्याची संधी शोधत असतात. पण ते कायदेशीर जाऊ शकत नसल्याने बेकायदेशीर मार्गाने पाठवले जातात, ज्याला डंकी रूट, डंकी फ्लाइट नावाने ओळखलं जातं.

काय आहे डंकी रूट?

सामान्य शब्दांमध्ये सांगायचं तर जेव्हा लोकांना वेगवेगळ्या देशांमध्ये थांबे घेत घेत बेकायदेशीर पद्धतीने दुसऱ्या देशात पाठवलं जातं तेव्हा त्याला डंकी रूट म्हटलं जातं. ही एक पंजाबी टर्म आहे ज्याचा अर्थ असा होता की, उड्या मारत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं. अमेरिकेला जाण्यासाठी साऊत आणि सेंट्रल अमेरिकेतील देश मुख्य एंट्री प्वाइंट्स आहेत. समुद्र, बस, टॅक्सी, जंगलातून पायी चालत या देशांमध्ये लोकांना पोहोचवलं जातं. ज्यासाठी कधी 1 महिना तर कधी 2 महिनेही लागू शकतात.

बेकायदेशीररित्या अमेरिकेत जाणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणजे तुम्हाला उपाशी मैलोमैल चालत रहावं लागतं आणि तहान भागवण्यासाठी पावसाची वाट बघावी लागते. यात एजन्ट्स तुमची फार मदत करत नाहीत. असं म्हणता येईल की, तुम्हाला तुमच्या रिस्कवर पुढे जात रहावं लागतं. एजन्टची जबाबदारी केवळ इतकी असते की, तो तुम्हाला रस्ता दाखवत राहणार. या मार्गे जाणारे सगळेच यशस्वी ठरतात असं नाही. अनेकांना जीव गमवावा लागतो आणि अनेकांना तुरूंगातही जावं लागतं. काही लोक खचून परत येतात. एजन्ट्सचा कारभार तुम्ही या गोष्टीवरून समजून घेऊ शकता की, 2022 मध्ये दोन लहान मुले ज्यातील एकाचं वय 3 आणि एकाचं 11 होतं हे दोघेही यूएसच्या सीमेच्या 10 मीटरवर मृत आढळले होते. एजन्ट्स त्याचे मृतदेह तिथेच सोडून पळाले होते.

कुठे जाण्याची जास्त क्रेझ?

बेकायदेशीरपणे अमेरिकेत जाणाऱ्यांमध्ये भारतीयांची संख्या जास्त आहे. अमेरिकेनंतर मेक्सिको, ग्वाटेमाला, अल सल्वाडोरचा नंबर लागतो. भारतात पंजाब, हरयाणा, यूपी आणि हिमाचल प्रदेशातून जास्त लोक जातात.

कसे जातात भारतीय लोक?

तरूणांना एज्युकेशन व्हिसाच्या नावावर परदेशात पाठवण्याची लालसा दाखवली जाते. जेव्हा तरूण पूर्ण रक्कम देतात तेव्हा सांगितलं जातं की, अॅप्लिकेशन फेटाळलं आहे. अशात निराश झालेल्या तरूणांना एजन्ट्स परदेशात जाण्याचा दुसरा मार्ग सुचवतात जो बेकायदेशीर असतो. एजन्ट्स त्यांच्याकडून लाखो रूपये घेतात आणि परदेशात पाठवतात. त्याला डंकी रूट म्हटलं जातं.

डंकी रूटने परदेशात पाठवण्यासाठी एजन्ट्स 20 ते 30 लाख रूपये घेतात. एका आकडेवारीनुसार, 2016, 2017 आणि 2018 मध्ये बेकायदेशीरपणे यूएसमध्ये जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2016 मध्ये साधारण साडे तीन हजार, 2017 मध्ये  साधारण 3 हजार आणि 2018 मध्ये 9 हजार लोकांना या मार्गाने यूएसमध्ये जाण्याची इच्छा होती. 2014 मध्ये साधारण 22 हजार भारतीयांनी यूएसमध्ये शरण देण्यासाठी अर्ज केले होते. यातील साधारण 7 हजार महिला होत्या. 

पंजाब- हरयाणात इतकी क्रेझ का?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अखेर पंजाब आणि हरयाणामधील लोकांमध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये जाण्याची इतकी क्रेझ का आहे? यासाठी थोडं मागे जावं लागेल. 20व्या शतकाच्या सुरूवातीला पंजाबच्या जवळपास प्रत्येक परिवारातून लोक अमेरिका, कॅनडा आणि यूकेमध्ये गेले. इथे या लोकांनी खूप मेहनत केली आणि याचा फायदाही झाला. हे लोक तिथून भारतात आपल्या परिवारांना पैसे पाठवत होते. अशात आर्थिक स्थिती सुधारली. हे पाहून दुसऱ्या लोकांच्या मनातही क्रेझ वाढली. कोणत्याही किंमतीत हे लोक परदेशात जाण्यासाठी तयार होते. ही स्थिती पाहून अनेक एजन्ट्सना पैसे कमावण्याची संधी मिळाली. 

अशाप्रकारे बेकायदेशीरपणे भारतीयांना परदेशात पाठवण्याचा सिलसिला सुरू झाला. परदेशात जाण्याबाबत पंजाब आणि हरयाणाचे तरूण म्हणतात की, आपल्या इथे धूळ-मातीत राहण्यापेक्षा कसेतरी अमेरिका, कॅनडा आणि यूकेला पोहोचून स्वत:चं आणि परिवाराचं भलं करू शकतात.

Web Title: What is the meaning of donkey route, know why its popular in Punjab and Haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.