Airplane Tyre Facts : विमानातून प्रवास करणं हा एक रोमांचक अनुभव असतो. खिडकीतून दिसणारा आकाशाचा आणि जमिनीचा नजारा मनाला मोहिनी घालणारा असतो. विमानप्रवास करत असताना सगळ्यात जास्त उत्सुकता टेकऑफ आणि लॅंडिंगची असते. विमान जेव्हा रनवेवर लॅंड होतं, तेव्हा टायर मोठा दबाव पडतो. प्रवाशांना आत जो झटका लागतो, त्यावरून याचा अंदाज येऊ शकतो की, टायरची काय स्थिती होत असेल. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे विमानाचे टायर इतके मजबूत असतात की, ते भरपूर दबाव सहन करू शकतात. अशात तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, विमानाचे टायर कशापासून बनवतात, ज्यामुळे ते सहजपणे फुटत नाहीत. अलिकडेच झालेल्या अहमदाबाद येतील विमान दुर्घटनेनंतर लोकांना विमानाच्या वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा इंटरेस्ट वाढला आहे. त्यामुळे विमानाच्या टायर काही खास गोष्टी आम्ही सांगणार आहोत.
कशापासून बनवतात हे टायर?
विमानाचे टायर हे सिंथेटिक रबर कंपाउंड्सच्या खास मिश्रणापासून तयार केले जातात. यांमध्ये अॅल्यूमिनिअम, स्टील आणि नायलॉनसारख्या गोष्टींचा वापर होतो. या गोष्टींमुळे टायर आणखी जास्त मजबूत होतात. याच कारणानं विमानाचे टायर अनेक हजार टन वजन आणि त्यामुळे पडणारा दबाव सहन करू शकतात. विमानाच्या एका टायरचं वजन ११० किलो असतं.
हवेचीही असते महत्वाची भूमिका
गुडइअर कंपनीमध्ये विमानाच्या टायरच्या प्रभावी ब्रांडी सांगतात की, विमानांच्या टायरमध्ये ट्रकच्या टायरच्या तुलनेत दुप्पट आणि कारच्या टायरच्या तुलनेत सहा पट जास्त हवा भरली जाते. कारण दबाव जेवढा जास्त असेल, टायर तेवढाच मजबूत होईल.
कोणता गॅस भरला जातो?
विमानांच्या टायरमध्ये नायट्रोजन भरलं जातं. नायट्रोजन गॅस ज्वलनशील नसतो. हेच कारण आहे की, तापमान आणि दबावातील बदलाचा यावर सामान्य हवेच्या तुलनेत कमी प्रभाव पडतो. नायट्रोजन गॅस असल्यानं टायरांमध्ये घर्षण झाल्यावरही आग लागण्याचा धोका नसतो.
विमानाचे टायर किती वर्ष चालतात?
कोणत्याही प्रवासी विमानाला जवळपास २० टायर लावले जातात. एका टायरचा वापर एकावेळी साधारण ५०० वेळा केला जातो. इतक्यांदा वापरल्यानंतर टायरला रिट्रेडिंगसाठी पाठवलं जातं. या प्रक्रियेत टायरवर पुन्हा एकदा नवीन ग्रिप चढवली जाते. त्यानंतर पुन्हा ५०० वेळा त्याचा वापर केला जातो. एका टायरवर एकूण सात वेळा ग्रिप चढवली जाते. अशाप्रकारे विमानाचे टायर जवळपास ३५०० वेळा वापरले जातात. त्यानंतर हे टायर कोणत्याही कामाचे राहत नाही. विमानातील समोरच्या टायरचं आयुष्य इतर टायरच्या तुलनेत कमी असतं.
कसे बनवले जातात टायर?
विमानाचे टायर इतक कोणत्याही टायरच्या तुलनेत सगळ्यात कठोर परिस्थितीसाठी बनवले जातात. जेव्हा कंपनी विमानासाठी नवीन टायर बनवते, तेव्हा ते एका प्रोटोटाइपनं सुरूवात होतात. टायरच्या खूप कठोर टेस्ट केल्या जातात. त्यांची गति, दबाव आणि ३८ टनाचा भार सांभाळण्याच्या क्षमतेचं परिक्षण केलं जातं. त्यामुळे हे टायर इतर टायरच्या तुलनेत वेगळ्या पद्धतीने तयार केले जाता.
लॅंडिगवेळी निघणाऱ्या धुराला घाबरू नका
विमान लॅंड करतेवेळी टायर जेव्हा रनवेवर फिरतात तेव्हा त्यातून धूर निघतो. याचं कारण हे आहे की, विमान रनवेवर उतरताच टायर फिरण्याऐवजी घसरतात. हे तोपर्यंत होतं, जोपर्यंत टायरच्या फिरण्याचा स्पीड विमानाच्या स्पीडच्या बरोबरीत येत नाही. त्यानंतर टायर घसरणं बंद होतं आणि ते सामान्यपणे फिरू लागतात. त्यामुळे पुढच्या वेळी विमानात बसाल तर घाबरू नका.