पाच दिवस श्वानांचे अन्न खा आणि पाच लाख रुपये जिंका, कंपनीची बंपर ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 12:58 PM2022-05-23T12:58:22+5:302022-05-23T13:04:37+5:30

युनायटेड किंगडममध्ये एका कंपनीने अजब ऑफर दिली आहे. त्यांना अशी व्यक्ती हवी आहे जी ५ दिवस कुत्र्याचं अन्न खाऊ शकेल. त्या बदल्यात त्यांना लाखो रुपये पगार देण्यात येणार आहे.

weird job win 5 lakh for eating dog food for 5 days | पाच दिवस श्वानांचे अन्न खा आणि पाच लाख रुपये जिंका, कंपनीची बंपर ऑफर

पाच दिवस श्वानांचे अन्न खा आणि पाच लाख रुपये जिंका, कंपनीची बंपर ऑफर

Next

काहींना रात्रंदिवस मेहनत करून पैसे हातात मिळतात, मात्र कधीकधी थोडी रिस्क घेऊन तुम्ही अगदी कमी वेळातही लाखो रुपये कमवू शकता. आम्ही आज व्यवसायाच्या जोखमीबद्दल बोलत नाहीये, तर यात तुम्हाला तुमच्या पचनसंस्थेसह भूकेच्या बाबतीत ही रिस्क घ्यावी लागेल. युनायटेड किंगडममध्ये एका कंपनीने अजब ऑफर दिली आहे. त्यांना अशी व्यक्ती हवी आहे जी ५ दिवस कुत्र्याचं अन्न खाऊ शकेल. त्या बदल्यात त्यांना लाखो रुपये पगार देण्यात येणार आहे (Company Offering 5 Lakh to Taste Dog Food).

कदाचित आजपर्यंत तुम्ही याहून विचित्र नोकरी पाहिली किंवा ऐकली नसेल. ही नोकरी Vegan Pet Company OMNI ने देऊ केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, तुम्हाला कुत्र्यासाठीचं अन्न ५ दिवस खावं लागेल आणि त्याच्या चवीबद्दल तसंच इतर गोष्टींचं विश्लेषण सांगावं लागेल. हे काम पूर्ण होताच तुम्हाला £5,000 म्हणजेच भारतीय चलनात ५ लाख रुपयांचा चेक मिळेल.

खरं तर हे काम फूड टेस्टरचं आहे, ज्याप्रमाणे फास्ट फूड कंपन्या बर्गर-पिझ्झा किंवा सँडविच खाण्यासाठी पैसे देतात, त्याचप्रमाणे OMNI कुत्र्यांसाठीचं व्हेगन फूड खाण्यासाठी पैसे देत आहे. नोकरीसाठी निवडलेल्या व्यक्तीला 5 दिवस कुत्र्यासाठीचं अन्न खावं लागेल. रताळे, पालेभाज्या, ब्राऊन राईस, भोपळा, ब्लूबेरी, वटाणे आणि क्रॅनबेरी यांचं मिश्रण करून ते तयार केलं जातं. ओम्नी फूड कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, ही कंपनी क्लीन लेबल असून अन्नामध्ये कोणताही छुपा घटक मिसळत नाही. खाणाऱ्याला अन्नाची चाचणी, ऊर्जा पातळी, मूड आणि त्याचा पचनसंस्थेवर होणारा परिणाम याविषयी अहवाल द्यावा लागेल. त्यांना अशा प्रयोगाद्वारे हे स्पष्ट करायचं आहे की कंपनी कुत्र्याला इतकं उत्कृष्ट अन्न देते की ते मानव देखील खाऊन पचवू शकतात.

कंपनीचे सह-संस्थापक म्हणतात की त्यांनी स्वतः कुत्र्यासाठीचं हे अन्न खाऊन टेस्ट केलं आहे, परंतु त्यांना इतरांकडूनही प्रतिक्रिया हवी आहे. यासाठी ३१ मेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. १८ वर्षे पूर्ण असलेला कोणताही ब्रिटिश नागरिक यासाठी अर्ज करू शकतो. यासाठी कोणतीही पात्रता आवश्यक नाही परंतु त्यांना त्यांच्या ऍलर्जी आणि वैद्यकीय परिस्थितीबद्दल माहिती देणं आवश्यक असेल. आहारतज्ञ त्यांच्या 5 दिवसांच्या अभिप्रायाचे विश्लेषण करतील आणि त्यानंतर त्यानुसार पुढील संशोधन केलं जाईल.

Web Title: weird job win 5 lakh for eating dog food for 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.