शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

भागमभाग! लग्नात २० पेक्षा जास्त जणांची गर्दी; पोलीस येताच नवरा नवरीनं भिंतीवरून उडी मारून धूम ठोकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 16:42 IST

लग्नात १५० ते २०० लोक सहभागी झाल्याची पोलिसांना माहिती मिळाली. ते लगेच पोलीस दल घेऊन हॉलवर आले आणि लोकांची पळापळ झाली.

कोरोना महामारी बघता पंजाब सरकारने लग्नात नवरदेव आणि नवरीकडून केवळ २० लोकांना येण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागते. तरी सुद्धा काही लोक नियम धाब्यावर बसवून लग्नात ठरलेल्या लोकांपेक्षा जास्त लोकांना बोलवत आहेत.

पटियालाच्या राजपुरा टाउनमध्ये असलेल्या कमेटी सेंटरमध्ये एक अशीच घटना समोर आली. इथे आलेल्या वरातील नियम धाब्यावर बसवून १५० ते २०० लोक आले होते. जशी याची माहिती पोलिसांना मिळाली तसे ते पोलीस दल घेऊन घटनास्थळी पोहोचले. (हे पण वाचा : हेच राहिलं होतं! कोरोना पॉझिटिव्ह पतीला किडनी देण्यास पत्नीचा नकार, म्हणाली - आधी संपत्ती नावे करा....)

लग्नात नवरी-नवरीदेवासहीत पाहुणे लोक विना मास्क आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांची माती करत होते. पोलीस जसे कमेटी सेंटरच्या आत पोहोचले तसे नवरी-नवरदेव आणि पाहुणे भींतीवरून उड्या घेऊन पळायला लागले होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आम्हाला बघून लग्नाच्या हॉलमध्ये एकच गोंधळ उडाला आणि लोक इकडे-तिकडे पळायला लागले होते. (हे पण वाचा : वाह रे वाह! पठ्ठयाने चक्क शरीरसंबंधासाठी केली ई-पासची मागणी, पोलिसांनी उचलून आणलं तर दिलं हे स्पष्टीकरण...)

पोलसांनी सांगितलं की, १५० ते २०० लोक लग्नात सहभागी झाले होते. तर नवरीच्या आईने सांगितलं की लग्नात केवळ २० लोक होते. पोलिसांनी नवरी आणि नवरदेव दोन्हीकडच्या लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस म्हणाले की, कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल. 

पंजाबमध्ये लग्नात गर्दीच्या अनेक घटना समोर येत आहेत. नुकतीच अशाच एका केसमध्ये पोलिसांनी नवरदेव आणि त्याच्या आजोबाला अटक केली होती. पोलीस म्हणाले की, कोरोना काळात  जे नियमांकडे दुर्लक्ष करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पंजाबमध्ये कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. 

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या