Watch Egypt luxor stunning lost golden city first video goes viral | Golden City Egypt: इजिप्तमध्ये सापडलं ३ हजार वर्ष जुनं 'सोन्याचं' अद्भुत शहर, समोर आला व्हिडीओ...

Golden City Egypt: इजिप्तमध्ये सापडलं ३ हजार वर्ष जुनं 'सोन्याचं' अद्भुत शहर, समोर आला व्हिडीओ...

इजिप्तमध्ये (Egypt) सापडलेल्या तीन हजार वर्ष जुन्या अद्भूत शहराची (Golden City Egypt) चर्चा जगभरात रंगली आहे. इतके वर्ष उलटून गेल्यावरही इजिप्तमधील या सर्वात मोठ्या प्राचीन शहराचे अवशेष बघितल्यावर असं वाटतं की, जसं हे शहर कालच तयार केलं असावं. या शहराला प्राचीन इजिप्तचं पोम्पेई असंही म्हणतात. लक्जर शहराच्या वाळूखाली साधारण ३४०० वर्ष जुनं शहर मिळण्याची घोषणा इजिप्तमध्ये डॉक्टर जही हवास यांनी केली होती. आता या 'सोन्याच्या शहराचा' व्हिडीओ समोर आला आहे. 

अनेक तज्ज्ञ म्हणाले की, इजिप्तचं हे शहर १९२२ मध्ये तूतनखामूनच्या मकबऱ्याच्या शोधानंतर सर्वात मोठा शोध आहे. साधारण ७ महिन्यांच्या खोदाकामानंतर हे शहर सापडलं. Anyextee या यूट्यूब चॅनलने या शहराचा पूर्ण व्हिडीओ जारी केला आहे. ते म्हणाले की त्यांच्याकडे या शहराचं एक्सक्लूसिव फुटेज आहे आणि आतापर्यंत ते कुणीही पाहिलं नाही.

इजिप्तचे तज्ज्ञ जाही हवास यांनी घोषणा केली की, 'हरवलेल्या सोन्याच्या शहराचा' शोध लग्जरजवळ लागला आहे. इथे राजांचं वास्तव्य होतं. हे शहर वाळूखाली हरवलं होतं. हे शहर ३४०० वर्ष जुनं असल्याचं सांगितलं जात आहे. 
हे शहर इजिप्तमध्ये शोधलं गेलेलं सर्वात विशाल प्राचीन शहर असल्याचं सांगितलं जात आहे. जॉन्स हॉपकिंस

यूनिव्हर्सिटीच्या इजिप्त कलेच्या प्राध्यापिका बेट्सी ब्रायन म्हणाला की, तूतनखामेनच्या मकबऱ्याच्या शोधानंतर हा दुसरा मोठा शोध आहे. यात काही दागिने, रंगीत भांडी, ताबीज आणि विटा सापडल्या आहेत. याआधीही अनेकदा या शहराचा शोध घेतला गेला. पण तेव्हा ते सापडलं नव्हतं. असा अंदाज आहे की, पुढील शोधा मोठा खजिना सापडू शकतो.
 

Web Title: Watch Egypt luxor stunning lost golden city first video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.