मांजरीचं पिल्लू की मानवी अर्भक, सत्य ऐकून तुम्हीही व्हाल थक्क  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 02:28 PM2017-10-25T14:28:34+5:302017-10-25T15:06:01+5:30

मलेशियात तथाकथित जन्माला आलेलं हे बाळ पाहून आपल्याला ते अजिबात गोड-गोंडस वाटणार नाही.

viral video newborn baby looks like a Kitten | मांजरीचं पिल्लू की मानवी अर्भक, सत्य ऐकून तुम्हीही व्हाल थक्क  

मांजरीचं पिल्लू की मानवी अर्भक, सत्य ऐकून तुम्हीही व्हाल थक्क  

ठळक मुद्देसोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोबाबात सध्या फार चर्चा  होत आहे.हा फोटो पाहून प्रत्येकाने कुतूहल व्यक्त केलंय तर अनेक जण संभ्रमात आहेत.कोणीतरी हा फोटो डाऊनलोड करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

मलेशिया - सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका फोटोबाबात फार चर्चा सध्या होत आहे. या फोटोत मांजर आहे की माणसाचं लहान मुल याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम आहे. कारण हा फोटो पाहून प्रत्येकाने कुतूहल व्यक्त केलंय. मांजर माणसाच्या रुपात जन्माला आलं आहे की, बाळाने एखादं रौद्ररुप धारण केलं आहे, याबाबतचा छडा लावण्यासाठी अनेकांनी फार संशोधन केलं. याबाबतचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या मांजरीचा जन्म मलेशियातील पहंग या  गावात झाला आहे आणि पुढील संशोधनासाठी त्याला एका लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे.


पण मलेशियातील पोलिसांनी हे सगळं प्रकरण चुकीचं असून सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो कोणीतरी मुद्दाम व्हायरल केला असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे या फोटोत मांजराचं पिल्लू किंवा लहान बाळ नसून हे केवळ एक खेळणं आहे. या खेळण्याचा फोटो काढून लोकांची दिशाभूल करण्यासाठीच कोणीतरी हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे एका लहान बाळाच्या डोक्यावर आणि पाठीवर केस आहेत. त्याचप्रमाणे एखाद्या राक्षसाप्रमाणे दातही बाहेर आलेले आहेत. हा फोटो इतका भयानक आहे की, फोटो पाहताच प्रत्येकजण अवाक् होतो. सिलिकॉन बेबी वेयरवुल्‍फ नावाच्या या खेळण्याची ऑनलाईन विक्री होत आहे. त्यामुळे कोणीतरी फोटो डाऊनलोड करून सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. अशा कोणत्याही फोटोवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन मलेशियातील पोलिसांनी केलं आहे.

सौजन्य - www.dailymail.co.uk

Web Title: viral video newborn baby looks like a Kitten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.