मिस्ड कॉलने बना दी जोडी! घरच्यांचा नकार, तरुणीची थेट पोलीस ठाण्यात धाव अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 16:37 IST2021-11-02T16:34:26+5:302021-11-02T16:37:16+5:30

एका मिस्ड कॉलनं सूत जुळलं; घरच्यांनी नकार देताच प्रेयसीनं पोलीस ठाणं गाठलं

viral video miss call fell in love girlfriend pleads for justice in police station | मिस्ड कॉलने बना दी जोडी! घरच्यांचा नकार, तरुणीची थेट पोलीस ठाण्यात धाव अन् मग...

मिस्ड कॉलने बना दी जोडी! घरच्यांचा नकार, तरुणीची थेट पोलीस ठाण्यात धाव अन् मग...

प्रेमात मोठी ताकद असते असं म्हणतात. प्रेमात सर्व बंधनं ओलांडली जातात. प्रेम जाती, धर्माच्या पलीकडे जाऊन एकमेकांना माणूस म्हणून पाहायला शिकवतं. कोणाला कसं आणि कधी प्रेम होईल हे सांगता येणं अवघड. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे याची प्रचिती आली आहे. एक तरुण केवळ मिस्ड कॉलमुळे तरुणीच्या प्रेमात पडला. 

व्हायरल व्हिडीओमध्ये तरुण-तरुणी लग्न बंधनात अडकत असल्याचं दिसतं. या प्रेमी युगुलसोबत तिथे अनेक जण उपस्थित आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. एका मिस्ड कॉलवरून दोघांचं सूत जुळलं. मात्र घरातून लग्नाला विरोध होता. त्यामुळे प्रेयसीनं पोलीस ठाणं गाठलं. बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये हा प्रकार घडला.

तरुणीचं गाऱ्हाणं ऐकल्यानंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना बोलावलं. त्यांची समजूत काढली. बऱ्याच प्रयत्नांनंतर दोन्ही कुटुंबं लग्नाला तयार झाली. त्यानंतर विवाह संपन्न झाला. या अनोख्या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read in English

Web Title: viral video miss call fell in love girlfriend pleads for justice in police station