बाबो! गरोदर महिलेची नक्कल करणं भारी पडलं; पठ्ठ्यानं पोटावर ३ टरबूज बांधलं, त्यानंतर जे घडलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 13:04 IST2021-08-23T13:03:43+5:302021-08-23T13:04:12+5:30
द सनमध्ये छापलेल्या रिपोर्टनुसार, एका व्यक्तीने गरोदर महिलेची नक्कल करण्यासाठी स्वत:च्या पोटावर ३ टरबूज आणि त्याला चिटकवून ठेवण्यासाठी टेपचा वापर केला

बाबो! गरोदर महिलेची नक्कल करणं भारी पडलं; पठ्ठ्यानं पोटावर ३ टरबूज बांधलं, त्यानंतर जे घडलं...
गरोदरपणात महिलेची काय अवस्था होते याबाबत महिलाच समजू शकतात. ९ महिने आपल्या बाळाला पोटात ठेवणाऱ्या महिलांना गरोदरपणात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गरोदर महिलेच्या याच वेदना समजून घेण्यासाठी एका व्यक्तीने जे काही केले ते त्याला चांगलेच महागात पडले. एका दिवसासाठी गरोदर होण्याची नक्कल करण्याची त्याला आयडिया सुचली. नेमकं गरोदरपणात कसं होतं हे त्याला जाणून घ्यायचं होतं.
गरोदर महिलेची नक्कल करण्यासाठी त्या व्यक्तीने त्याच्या पोटाला अवजड वस्तू बांधली त्यानंतर उठण्याचा प्रयत्न करूनही त्याला बेडवर उठता आलं नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ टिकटॉक चॅनेल मैटलँड हैनली(Maitland Hanley) यावर जवळपास १० लाखाहून अधिक लोकांनी बघितला आहे.
व्यक्तीनं गरोदर महिलेची नक्कल केली
महिलांना गरोदरपणात अजब खट्टामिठा खाण्याची इच्छा असते. इतकचं नाही तर गरोदरपणात महिलेचा चेहरा ग्लो होतो. कासवाच्या गतीने महिलांना कामं करावी लागतात. काही असाच अनुभव घेण्यासाठी या व्यक्तीनं स्वत:वर हा प्रयोग करुन पाहिला. परंतु त्याचा हा प्रयत्न त्याला भलताच महागात पडला. त्याला बेडवरुन उठताच आलं नाही. पोटावर बांधलेल्या अवजड वस्तूने त्याला काहीच हालचाल करता येत नव्हती.
पोटावर बांधलं टरबूज उठताच आलं नाही
द सनमध्ये छापलेल्या रिपोर्टनुसार, एका व्यक्तीने गरोदर महिलेची नक्कल करण्यासाठी स्वत:च्या पोटावर ३ टरबूज आणि त्याला चिटकवून ठेवण्यासाठी टेपचा वापर केला. व्हिडीओत तो गरोदर महिलेची नक्कल करण्यासाठी दिवसाची सुरुवात सकाळी सकाळी बेडवर झोपण्याचा अभिनय करत होता. बेडच्या शेजारी घड्याळाचा अलार्म वाजतो. त्यानंतर बीप आवाज आल्यानंतर तो अलार्म बंद करतो आणि बेडवरुन उठण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याला बेडवरुन उठताच येत नाही. पोटावर बांधलेल्या टरबूजाचं वजन इतकं होतं की त्याला हालचालही करणं शक्य होत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकजण शेअर करत आहेत. या व्हिडीओवर नेटिझन्स भन्नाट कमेंट देत असून काहींनी महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल भाष्य केले आहे.