शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

Viral News: हिटलरच्या तुरुंगातून पळ काढणाऱ्या सैनिकाच्या 'रोलेक्स'चा लिलाव; कोट्यवधी रुपयांमध्ये विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 17:29 IST

Viral News: दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिटलरच्या छावणीतून पळून जाणाऱ्या ब्रिटीश सैनिकाच्या रोलेक्स घडाळ्याला लिलावात कोट्यवधी रुपयांची बोली लागली.

Viral News: हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरने दुसऱ्या महायुद्धावेळी हजारो सैनिकांना बंदी बनवले होते. हिटलरच्या तुरुंगातून पळून जाणे जवळजवळ अशक्य होते, पण अनेकांनी यातून पळ काढला होता. अशाच एका ब्रिटिश कैद्याने घातलेल्या रोलेक्स घड्याळाचा इतक्या वर्षानंतर लिलाव करण्यात आला आहे. गुरुवारी न्यूयॉर्क येथे झालेल्या लिलावात घड्याळाला $1,89,000 (रु.1,47 कोटी)बोली लागली.

अॅडॉल्फ हिटलरच्या काळात त्याच्या पक्षाला नाझी पार्टी म्हटले जायचे, तर जर्मनीला नाझी जर्मनी म्हणत. या नाझी छावणीतून पळ काढणाऱ्या एका ब्रिटिश सैनिकाच्या घड्याळाचा इतक्या वर्षानंतर लिलाव झाला. दरम्यान, घड्याळ खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव अद्याप समोर आलेले नाही. लिलाव करणाऱ्यांनी घड्याळाची विक्री किंमत 2 लाख ते 4 लाख डॉलर्सपर्यंत सांगितली जात होती. परंतू, लिलावात घडाळ्याला कोट्यवधी रुपयांची बोली लागली.

अशी आहे घड्याळाची कथा...24 मार्च 1944 रोजी नाझी कैदी छावणीतून ब्रिटिश सैनिकांचा एक गट पळून गेला होता. या गटामध्ये गेराल्ड एम्सन नावाच्या ब्रिटिश सैनिकाचाही समावेश होता. हे घड्याळ त्याचेच आहे. हिटलरच्या छावणीतून पळून जाणे खूप मोठी गोष्ट होती. या घटनेवर आधारित 1963 मध्ये 'द ग्रेट एस्केप' नावाचा चित्रपटही आला आहे.

कैद्यांना पळून जाण्यात घडाळाची मोठी मदतया घड्याळाचा लिलाव आयोजित करणाऱ्या क्रिस्टीज या लिलाव कंपनीने म्हटले की, एम्सनने हे घड्याळ स्वित्झर्लंडमधून मागवले होते. ही छावनी सध्याच्या पोलंडमधील झगान या शहराजवळ आहे. काळ्या रंगाचे चमकदार डायल असलेले हे स्टीलचे घड्याळ कैद्यांच्या सुटकेसाठी खूप उपयुक्त ठरल्याचे लिलावगृहाचे म्हणणे आहे. किस्टिगेच्या म्हणण्यानुसार, या घड्याळामुळेच कैद्यांना बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल, हे कळाले. यासोबतच त्यांना पहारेकऱ्यांच्या गस्तीची वेळही समजली.

पळून गेलेल्या कैद्यांचे काय झाले?हिटलरच्या छावणीतून सुमारे 200 कैदी पळून गेले होते. मात्र, तेथून केवळ 76 जणांची सुटका होऊ शकली, इतर कैदी पुन्हा पकडले गेले. या दुर्दैवी कैद्यांमध्ये एम्सनही होता. परत पकडलेल्या कैद्यांपैकी 50 कैद्यांना फाशी देण्यात आली. सुदैवाने एम्सन फाशीपासून बचावला. अखेर 1945 मध्ये युद्ध संपल्यानंतर एम्सनची छावणीतून सुटका करण्यात आली. एम्सनने 2003 मध्ये मृत्यू होईपर्यंत हे घड्याळ स्वतःजवळ ठेवले होते. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स